रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: मंगळवार, 20 डिसेंबर 2022 (21:39 IST)

उद्योग निरीक्षक पदासाठीची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर

maharashtra lokseva aayog
मुंबई – महाराष्ट्र गट-क सेवा (मुख्य) परीक्षा – 2021 मधील उद्योग निरीक्षक, उद्योग संचालनालय संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली असून त्याआधारे उमेदवारांकडून भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प मागविण्यात येत आहे.
 
या परीक्षेच्या भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्याकरीता आयोगाच्या https://mpsc.gov.in या संकेतस्थळावरील ‘ ONLINE FACILITIES’ या मेनूमध्ये ‘Post Preference / Opting Out’ वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे. ही वेबलिंक दिनांक 20 डिसेंबर, 2022 रोजी 12.00 वाजेपासून दिनांक 26 डिसेंबर, 2022 रोजी 11.59 (रात्री) वाजेपर्यंत सुरु राहील.
 
भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याचा (Opting Out) विकल्प सादर करण्यास कोणत्याही प्रकारची तांत्रिक अडचण उद्भवल्यास आयोगाच्या 1800-1234-275 किंवा 7303821822 या टोल फ्री क्रमांकावर अथवा [email protected] या ई-मेल आयडीवर विहित कालावधीत संपर्क साधता येईल, असे महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाकडून कळविण्यात आले आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor