शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By
Last Modified: बुधवार, 16 जून 2021 (22:21 IST)

यश मंत्र ,आपल्या कामाबद्दल सकारात्मक दृष्टीकोन ठेवा

वागणूक किंवा वृत्ती ज्याला इंग्रजीत ऍटिट्यूड असं म्हणतात. अखेर हा ऍटिट्यूड काय आहे? वृत्ती किंवा ऍटिट्यूड नकारात्मक दृष्टीकोनातूनच बघितलं जातं.जर एखादा कमी बोलतो किंवा आपल्या कामाकडेच लक्ष देतो तर त्याला ऍटिट्यूड आहे असं म्हणतात .आपण शब्दकोशात किंवा डिक्शनरी मध्ये जर ऍटिट्यूड शब्दाला शोधले तर त्याचा अर्थ आहे आयुष्यासाठी बघण्याचा दृष्टीकोन,विचार करण्याची ,वागण्याची पद्धत आहे ऍटिट्यूड.
 
चांगल्या आणि वाईट प्रवृत्तीच्या आधारावर सकारात्मक आणि नकारात्मक असे दोन प्रकार असतात. म्हणूनच, केवळ नकारात्मकतेसाठी  वृत्ती समजणे योग्य नाही.
 
कोणत्याही कामाच्या यशाच्या मागे आपले विचार त्या कामासाठी आपल्या  दृष्टीकोनावर अवलंबवून असतात.आपण त्या कामाला कोणत्या दृष्टीकोनातून बघतो या वर आपल्याला मिळणारे यश -अपयश निर्भर करतात.असचं आपल्या करिअरच्या बाबतीत असतं.आपण कुठले ही काम करायला आपला दृष्टीकोन चांगला ठेवावा.करिअरची निवड करताना सकारात्मक दृष्टीकोन ठेवावा. असं केले नाही तर आपली एक चूक आपले अवघे करिअरला कमकुवत करेल.कुठल्याही करिअर च्या क्षेत्रात यश मिळविण्यासाठी त्याच्या प्रति सकारात्मक दृष्टीकोनचे महत्व समजून घ्यावे.
 आपण आपले आदर्श ऍटिट्यूड म्हणून निर्धारित करू शकता.
आपण लक्षप्राप्तीसाठी तीन आदर्शांना आपल्या करिअरच्या निवडसाठी निर्धारित करा.
 
1 अभिमान- हा शब्द फारच कठीण आहे, परंतु याला अहंकाराच्या स्वरूपात न घेता आत्मसन्मानाच्या किंवा स्वाभिमानाच्या स्वरूपात घ्यावे. 
 तरच आपण आपल्या कामासाठी अभिमान बाळगण्यास सक्षम असाल.
गर्व आणि अहंच्या मध्ये एक पातळ थर आहे.
 
2 उतकंठता-कोणत्याही करिअरची निवड आवड म्हणून करण्यात मूर्खपणा आहे असं केल्याने पुढील भविष्यात आपण त्या क्षेत्रात यश मिळवू शकणार नाही आणि आपल्याला त्या कामात बऱ्याच अडचणींना समोर जावं लागू शकत.म्हणून करिअरची निवड करताना आपल्याला साजेशी आपली आवड असणारे आणि त्या कामात पूर्णपणे स्वतःला अर्पूण देणारे पाहिजे जे यश प्राप्तीसाठी काम पूर्ण करतील.आपली कामाच्या प्रति प्रबळ इच्छाच आपल्याला यश मिळवून देईल.
 
3  आत्मविश्वास -असं म्हणतात की आत्मविश्वासाच्या बळावर कोणीही काहीही करू शकत.जर आपल्याला स्वतःवर विश्वास आहे तर आपण जग देखील जिंकू शकता.आपण आपल्या आयुष्याचा काही ध्येय निश्चित केला आहे आणि आपल्याला यशप्राप्तीवर विश्वास आहे तर आपण पूर्ण उत्साहाने पुढे वाढा.आपण स्वतःवर विश्वास ठेवा की आपण हे काम करू शकता. आपल्यामध्ये  प्रतिभेची काहीच कमी नाही.ही विचारसरणी आपल्याला यशाच्या मार्गावर नेईल.जे स्वप्न आपण बघितले आहे ते पूर्ण करण्यात मदत करेल.
मग हे तीन आदर्श आपल्या आयुष्यात अवलंबवा आणि यशाच्या उंच शिखरावर पदार्पण करा.