सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 (23:50 IST)

राज्यात 11,394 नवीन कोरोना रुग्ण आढळले ,तर 21,677 रुग्णांना डिस्चार्ज

राज्यात आज दिवसभरात 1,394  नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली असून 21,677 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आले आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार, राज्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या 77 लाख 94 हजार 034 एवढी झाली आहे. त्यापैकी 75 लाख 13 हजार 436 रुग्ण बरे झाले असून राज्याचा रिकव्हरी रेट 96.40 टक्के आहे.
राज्यात आज 68 जणांचा मृत्यू झाला असून आजवर एकूण 1,43,008 रुग्ण मृत्युमुखी झाले आहे. राज्याचा कोरोनामृत्यूदर 1.83 टक्के आहे. सध्या राज्यात 2,447 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. तर 7,95,442 जण होम क्वारंटाईन आहेत.