शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: गुरूवार, 21 जुलै 2022 (21:46 IST)

राज्यात गुरुवारी कोरोनाचे २ हजार २८९ नवे रुग्ण

corona
राज्यात गुरुवारी कोरोनाचे २ हजार २८९ नवे रुग्ण सापडले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नव्या कोरोना बाधितांचा आकडा दोन हजारांवरच अडकला आहे. तर, २४०० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे आतापर्यंत ७८ लाख ६४ हजार ८३१ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
 
गुरुवारी  सापडलेल्या एकूण रुग्णांपैकी सर्वाधिक रुग्ण पुण्यात आहे. कालही पुण्यात सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण आढळले होते. तर, दुसरीकडे राज्यात सहा कोरोनाबाधितांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील मृत्यूदर १.८४ टक्के झाला आहे. तसंच, रुग्ण बरे होण्याचं प्रमाण ९७.९७ टक्के आहे.
 
राज्यात सध्या १४ हजार ५१९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत तर, पुण्यात ५ हजार १२५ रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. तसेच, १९३७ रुग्णांवर मुंबईत उपचार सुरू आहेत.