शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मुंबई , सोमवार, 20 एप्रिल 2020 (07:25 IST)

Coronavirus : राज्यात काल ५५२ नवीन रुग्णांचे निदान; आरोग्यमंत्र्यांची माहिती

काल राज्यात कोरोनाबाधीत ५५२ नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या ४२०० झाली आहे. १४२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ५०७ रुग्ण बरे झाले आहेत. तर एकूण ३४७० रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
कालपर्यंत पाठविण्यात आलेल्या ७२ हजार ०२३ नमुन्यांपैकी ६७ हजार ६७३ जणांचे नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर ४२०० जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ८७ हजार २५४ लोक होम क्वारंटाईनमध्ये असून ६,७४३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात १२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई येथील ६ आणि मालेगाव येथील ४ तर १ मृत्यू सोलापूर मनपा आणि १ मृत्यू जामखेड अहमदनगर येथील आहे. त्यात ४ पुरुष तर ८ महिला आहेत. आज झालेल्या १२ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ६ रुग्ण आहेत. तर ५ रुग्ण हे वय वर्षे ४० ते ६० या वयोगटातील आहेत व एक रुग्ण ४० वर्षांखालील आहे.

मालेगाव येथील मृत्युमुखी पडलेल्या ४ रुग्णांना इतर काही आजार आहेत का याची माहिती अद्याप अप्राप्त आहे. उर्वरित ८ जणांपैकी ६ रुग्णांमध्ये ( ७५ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २२३ झाली आहे.