शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: रविवार, 28 नोव्हेंबर 2021 (10:22 IST)

नव्या विषाणूची चिंता, दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या दोघांना कोरोनाची लागण

कोरोनाचं संकट सुरू झाल्यापासून म्हणजे जवळपास गेल्या दोन वर्षात कोरोना कमी झाला असं वाटू लागतात, नवा एखादा विषाणू येतो आणि पुन्हा चिंता वाढतात. सध्यादेखील आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन या विषाणूनं चिंता वाढवली आहे.
दक्षिण आफ्रिकेतून आलेले दोन प्रवासी कोरोनाबाधित आढळल्यानं भारताच्या चिंतेत आणखीच वाढ झाली आहे.
दक्षिण आफ्रिकेतून बेंगळुरू विमानतळावर दाखल झालेल्यांमध्ये या दोन कोरोनाग्रस्तांचा समावेश आहे. मात्र त्यांच्या शरीरात कोरोनाचा हा नवा विषाणू आढळला की नाही, हे मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही.
शनिवारी (27 नोव्हेंबर) बेंगळुरूच्या विमानतळावर उतरलेल्या विमानातून दक्षिण आफ्रिकेतून 94 जण आले होते. त्यापैकी दक्षिण आफ्रिकेचे दोन नागरिक कोरोनाग्रस्त आढळले आहे. इतर सर्वांना ट्रॅक करून त्यांच्याही चाचण्या करण्यात आल्या आहेत.
सर्व प्रवाशांना विलगीकरणात ठेवण्यात आलं आहे, तर काही प्रवाशांची माहिती घेणं अजूनही सुरू आहे.