सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (07:36 IST)

महाराष्ट्रात चौथ्या आणि पाचव्या अशा दोन नवीन स्ट्रेनची पुष्टी

भारतात कोरोनाचे दोन नवीन प्रकार सापडले आहेत. केंद्र सरकारने वाची समिती स्थापन केली होती. या समितीने भारतातील 3500 नमुन्यांची पाहणी केली. त्यापैकी इंग्लंड व्हेरियंट्सच्या सुमारे 187 घटना आढळल्या आहेत. दुसरे म्हणजे, दक्षिण आफ्रिकामध्ये 6 लोकांमध्ये व्हेरिएंट इन्फेक्शन झाले आहे. तिसरा ब्राझिलमध्ये एक नवा प्रकार आढळून आला आहे. याव्यतिरिक्त महाराष्ट्रात चौथ्या आणि पाचव्या अशा दोन नवीन स्ट्रेनची पुष्टी झाली आहे. अशा प्रकारे, आतापर्यंत एकूण नवे पाच स्ट्रेन सापडले आहेत.
 
कोरोनाचे नवे पाच स्ट्रेन आढळून आले आहेत. यातले दोन नवे स्ट्रेन महाराष्ट्रात आढळून आल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. केंद्र सरकारने कोरोना विषाणूच्या संशोधनासाठी एक समिती बनवली होती. त्या समितीने अहवाल दिला आहे. त्यातून हे नवे पाच स्ट्रेन आढळून आले आहेत. पहिला इंग्लंडमधील स्ट्रेन आहे. तर दुसरा दक्षिण आफ्रिकेतील नवा स्ट्रेन भारतात आला आहे. तिसरा स्ट्रेन ब्राझिलमधला असून चौथा आणि पाचवा स्ट्रेन महाराष्ट्रात आढळून आला आहे. दरम्यान, या नव्या स्ट्रेनमुळे कोरोनाचा फैलाव होत असल्याची शक्यता आरोग्य मंत्रालयानं फेटाळून लावली.