मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 4 ऑक्टोबर 2021 (10:40 IST)

कोरोनाचा उद्रेक :नगर जिल्ह्याच्या 60 गावांमध्ये लॉक डाऊन

कोरोनाची दुसरी लाट जरी ओसरली आहे तरी काही राज्यात कोरोनाचा उद्रेक अजून सुरु आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यावर जनजीवन सुरळीत होत आहे. राज्यात काही ठिकाणी कोरोनाची प्रकरणे पुन्हा वाढत आहे. सध्या राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील 20 गावात कोरोनाची प्रकरणे वाढत आहे.या जिल्ह्याच्या 11 तालुक्यातील तब्बल 60 गावांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण लॉक डाऊन जाहीर करण्यात आला आहे. या मध्ये केवळ अत्यावश्यक सेवांना वगळता लॉक डाऊन जाहीर करण्यात आले आहे. अशी सूचना आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे. 
हे लॉक डाऊन 4 ते 13 ऑक्टोबर या कालावधीत लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढले आहे त्यात त्यांनी कोरोनाच्या निर्बंधचे पालन करण्याचे सांगितले आहे.तसेच आजूबाजूच्या गावांनाही सतर्क राहण्याचे आदेश दिले आहे.लॉक डाऊन लावण्याच्या गावांमध्ये संगमनेर तालुक्यातील 24 गाव,श्री गौंदातील 9 गाव,राहतात 7 गाव आणि पारनेर तालुक्यातील 6 गावांचा समावेश आहे. या शिवाय श्रीरामपूर, पाथर्डी, कर्जत, नेवासा, शेवगाव, कोपरगाव,अकोला तालुक्यातील काही गावांचा समावेश आहे.