राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.61 टक्के
राज्यात शुक्रवारी 24,947 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 103 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर 1.86 टक्के एवढा झाला आहे. तर 45,648 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.61 टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यात 14,61,370 व्यक्ती होम क्वारंटाईन आहेत तर 3200 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात एकूण 2,66,586 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 76,55,554 झाली आहे. यात राज्यात शुक्रवारी 110 ओमिक्रॉनबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. हे सर्व रुग्ण पुण्यातील आहेत.
मुंबईतील आत्तापर्यंत 1,043,059 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर त्यातील 7,29,553 रुग्ण लक्षणे विरहित होते. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर 97 टक्क्यांवर पोहचला आहे. कोरोना रुग्णवाढीचा दर हा 0.27 टक्के पर्यंत खाली आला आहे.
तर रुग्ण दुपटीचा दर ही 259 दिवसांपर्यंत वाढला आहे. मुंबईत सक्रिय रुग्णांचा आकडा ही कमी होऊन 14,344 पर्यंत कमी झाला आहे. मुंबईत आज 11 रुग्णांचा मृत्यू झाला असून एकूण मृतांचा आकडा 16,591 वर पोहचला आहे. आज 27,720 चाचण्या करण्यात आल्या असून आतापर्यंत 1,51,57,551 चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर आतापर्यंत 1,009,374 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या कमी होऊन 20 झाली आहे.