बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 14 सप्टेंबर 2020 (16:07 IST)

अपु-या मनुष्यबळामुळे कोविड केअर सेंटर खासगी संस्था चालवणार, दहा कोटीचा खर्च अपेक्षित

पिंपरी चिंचवड येथील कोरोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेने 16 ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले आहेत. मात्र, मनुष्यबळाअभावी ते खासगी रुग्णालये, स्वयंसेवी किंवा सामाजिक संस्थांना तीन महिने कालावधीसाठी चालविण्यास देण्यात येणार आहेत. यासाठी सहा संस्था पुढे आल्या असून, त्यांना कामाचा आदेशही दिला आहे. यासाठी सुमारे दहा कोटी 12 लाख 23 हजार रुपये खर्च अपेक्षित आहे.
 
महापालिकेने डी. वाय. पाटील मुलींचे वसतिगृह रावेत, मागावसर्गीय मुलांचे वसतिगृह मोशी, सामाजिक न्याय विभागाचे वसतिगृह मोशी, घरकुल इमारत क्रमांक डी पाच ते आठ, बी 10 व 12, बालाजी लॉ कॉलेज ताथवडे, म्हाडा वसाहत महाळुंगे सी-11, बी-11 व 12, ए-11, बालेवाडी स्पोर्टस्‌ कॉम्प्लेक्‍स, पीसीसीओपी वसतिगृह आकुर्डी, इन्फ्रास्ट्रक्‍चर लोकोटेड आणि हॉटेल क्रिस्टल कोर्ट आदी ठिकाणी कोविड केअर सेंटर उभारले आहेत.
 
ते चालविण्यासाठी ट्रस्ट हेल्थ केअर, आयकॉन हॉस्पिटल, डीवाईन हॉस्पिटल, डॉ. भिसे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल, रुबी अलकेअर सर्विसेस, बीव्हीजी इंडिया, आयुश्री मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल आणि एक्‍सटेन्सिबल सॉफ्टवेअर टेक्‍नोलॉजी कंपनी या संस्था तयार झाल्या आहेत. त्यांना प्रतिबेड प्रतिदिवस मंजूर दराप्रमाणे तीन महिने कालावधीसाठी शुल्क दिले जाणार आहे. ठिकाण व बेडच्या संख्येनुसार एका बेडचे एका दिवसाचे शुल्क ठरविण्यात आले आहे.
 
कोविड केअर सेंटर शुल्क
 
बेड क्षमता : शुल्क (प्रतिबेड)
100 : 699
200 : 543
300 : 500
 
कोविड केअर सेंटर
एकूण सेंटर : 16
संचालक संस्था : 6
एकूण बेड : 3500
अपेक्षित खर्च : 10,12,23,000