गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 25 डिसेंबर 2021 (11:47 IST)

बूस्टर डोस संदर्भात 3000 जणांवर चाचणी करून घेणार निर्णय

कोरोनापासून अधिक संरक्षण मिळण्यासाठी दोन डोस घेतलेल्यांना बूस्टर डोस द्यायचा की नाही याचा अभ्यास करण्यासाठी 3 हजार जणांवर चाचणी केली जाणार आहे.
केंद्र सरकारनं यासाठी अभ्यास करायला सुरुवात केली आहे. कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस घेऊन सहा महिने पूर्ण झालेल्यांना तिसरा बूस्टर डोस देऊन ही चाचणी केली जाणार आहे.
दुसरा डोस घेतल्यानंतर पाच महिन्यांनी लसीचा प्रभाव 70% पर्यंत कमी होतो. बूस्टर डोसमुळं कोरोनाच्या संसर्गानंतरही गंभीर आजारी पडण्यापासून संरक्षण मिळतं असंही समोर आलं आहे.
कोविशिल्ड, कोव्हॅक्सिन आणि स्पुतनिक-V या लसींचा यामध्ये समावेश केला जाणार आहे. त्यातून लसीपासून मिळालेली प्रतिकारशक्ती किती काळ टिकू शकते याचा अभ्यास केला जाईल.
ICMR चे महासंचालक डॉ. बलराम भार्गव यांनी याबाबचं धोरण ठरवण्याचा विचार असल्याचं म्हटलं आहे. ओमायक्रॉन विरुद्ध लसीच्या परिणामकारकतेची चाचणी घेत आहोत असंही त्यांनी सांगितलं.