सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Updated : रविवार, 29 मे 2022 (17:45 IST)

पुण्यात नव्या कोरोना व्हेरियंट BA.4 चे चार तर BA.5 चे तीन रुग्ण आढळले

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे कोरोनासाठी लावण्यात आलेले सर्व निर्बंध काढण्यात आले आहे. आता कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होताना दिसत आहे. आज राज्यात कोरोनाचे नवे व्हेरियंट BA.4 आणि  BA.5 व्हेरियंटचे तीन रुग्ण आढळल्याची माहिती समोर आल्यामुळे राज्याचं आरोग्य विभाग सतर्क झालं आहे. 
पुण्यातील बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाच्या समन्वयाने सुरुअसलेल्या जनुकीय क्रमनिर्धारण सर्वेक्षणाच्या अहवालानुसार, पुण्यात BA.4 चे चार तर BA.5 चे तीन रुग्ण आढळले आहे. 
 
राज्यात नव्या कोरोना व्हेरियंट BA चे सर्व रुग्ण पुण्यातील आहे. यामध्ये चार पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांनी कोरोना लसीकरणाचे दोन डोस घेतले आहे. या मध्ये एका 9 वर्षाच्या मुलाचा समावेश देखील आहे. या मुलाने अद्याप कोरोनाची लस घेतलेली नाही. या सर्व रुग्णांना कोरोनाची सौम्य लक्षणे असून त्यांना घरातच आयसोलेट करण्यात आले आहे.