मंगळवार, 3 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: सोमवार, 24 जानेवारी 2022 (14:04 IST)

ओमिक्रॉनचा नवीन स्ट्रेन BA.2 भारतात दाखल, 530 नमुने सापडले; जाणून घ्या हा व्हायरस किती धोकादायक आहे

नवी दिल्ली : जगभरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. अशा परिस्थितीत कोरोनाचे नवीन प्रकार ओमिक्रॉननेही कहर केला आहे. दरम्यान, Omicron subvariant BA.2 आढळून आले आहे, ज्यामुळे लोकांची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. आतापर्यंत भारतात या उप-प्रकाराचे 530 नमुने सापडले आहेत.
 
हा उप-प्रकार भारतात दाखल झाला
ओमिक्रॉन सब-व्हेरियंटने यूकेमध्ये खळबळ उडवून दिली आहे. पण आता भारतातही एन्ट्री घेतली आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, BA.2 प्रकार ओमिक्रॉनपेक्षा वेगाने पसरतो. ब्रिटिश आरोग्य विभागाने ओमिक्रॉनच्या या उप-प्रकाराशी संबंधित शेकडो प्रकरणे ओळखली आहेत. यूके हेल्थ प्रोटेक्शन एजन्सी (UKHSA) ने त्याच्या वाढत्या केसेसच्या तपासणीनंतर त्याचे नाव BA.2 ठेवले आहे.
 
भारतात 530 नमुने सापडले
माहितीनुसार, जानेवारीच्या पहिल्या 10 दिवसांत यूकेमध्ये या प्रकाराची 400 हून अधिक प्रकरणे आढळून आली आहेत. एका ऑनलाइन न्यूज मीडिया रिपोर्टनुसार, ओमिक्रॉन सब-व्हेरियंटचे 530 नमुने भारतात, 181 स्वीडनमध्ये आणि 127 सिंगापूरमध्ये आढळले आहेत.
 
'Omicron आणि BA.2 समान आहेत'
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन (WHO) ने ओमिक्रॉन प्रकाराचे वर्णन 'व्हेरिएंट ऑफ कंसर्न' असे केले आहे. असे मानले जाते की त्याचे सब व्हेरिएंट BA.2 देखील समान आहे. म्हणजेच, या दोन्हींमध्ये कोणताही महत्त्वाचा फरक नाही. तथापि, भविष्यात साथीच्या रोगाच्या प्रसारावर त्याचा कसा परिणाम होऊ शकतो हे ठरवण्यासाठी वैज्ञानिक त्यावर बारीक लक्ष ठेवून आहेत.
 
BA.2 प्रकरणे सुमारे 40 देशांमध्ये आढळली
अहवालानुसार, आतापर्यंत सुमारे 40 देशांमध्ये ओमिक्रॉनचे नवीन सब व्हेरिएंटआढळले आहेत. डेन्मार्कमध्ये सर्वाधिक BA.2 प्रकरणे नोंदवली गेली आहेत, डॅनिश तज्ञांना भीती आहे की नवीन प्रकारामुळे ओमिक्रॉन विषाणूमुळे साथीच्या रोगाची दोन वेगळी शिखरे येऊ शकतात. Omicron चे BA.2 उप-प्रकार केवळ जीनोम अनुक्रमाद्वारे शोधले जाऊ शकते.