1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: शनिवार, 29 मे 2021 (07:37 IST)

सक्रिय रुग्णांची संख्या 3 लाखांच्या खाली, 20,740 नवे रुग्ण

गेल्या काही दिवसांमध्ये नव्याने सापडणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने तीस हजारांच्या खालीच राहात असून ती आता वीस हजारांच्या घरात पोहोचली आहे. शुक्रवारी राज्यात एकूण 20 हजार 740 नवे कोरोनाबाधित सापडले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या देखील तीन लाखांच्या खाली आली आहे.
 
आरोग्य विभागाच्या वतीने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, राज्यातील आत्तापर्यंत सापडलेल्या एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 56 लाख 92 हजार 920 इतका झाला आहे. त्यापैकी 53 लाख 07 हजार 874 रुग्ण उपचारानंतर बरे झाले असून, 31 हजार 671 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. सध्या राज्यात 2 लाख 89 हजार 088 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
 
 राज्यात 424 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 93 हजार 198 जण कोरोनामुळे दगावले आहेत. राज्याचा कोरोना मृत्यूदर 1.64 टक्के एवढा आहे. राज्याचा रिकव्हरी रेट वाढला असून, सध्या 93.24 टक्क्यांवर पोहोचला आहे.
 
राज्यात आतापर्यंत 3 कोटी 43 लाख 50 हजार 186 नमुने तपासण्यात आले आहेत. राज्यात सध्या 21 लाख 54 हजार 976 जण होम क्वारंटाईन आहेत तर, 16 हजार 078 जण संस्थात्मक क्वारंटाईन आहेत.