शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. कोरोना विषाणू
Written By
Last Modified: मंगळवार, 26 डिसेंबर 2023 (08:20 IST)

देशभरासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्याचा आलेख चढताच

coorna
पुणे : देशभरासह राज्यात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढत आहे. त्यामुळे आरोग्य व्यवस्था कामाला लागली आहे. त्यातच कोरोनाच्या जेएन 1 या नव्या व्हेरियंटचेही रुग्ण आढळायला लागलेत. एकटा ठाण्यात पाच रुग्ण आढळलेत, त्याशिवाय पुण्यातही जेएन 1 व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले. त्यामुळे चिंता वाढली आहे. आरोग्य विभाग आणि डॉक्टरांनी खबरदारी घेण्याचे आव्हान केले आहे.
 
राज्यातील कोरोना विषाणूच्या रुग्णसंख्या पुन्हा एकदा वाढताना दिसते आहे. राज्यात काल नव्याने 50 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. सोबतच, जेएन 1 व्हेरीयंटच्या रुग्णांची संख्या 10 वर जाऊन पोहोचली आहे. एकीकडे सणांचे दिवस असताना वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय ठरते आहे.
 
राज्यात पुन्हा एकदा कोरोनाच्या रुग्णसंख्येत वाढ झाल्याचे दिसते आहे. एका महिन्याआधी कोरोना संपूर्णपणे बाजूला होईल असे चित्र आकडेवारीवरुन दिसत होते. मात्र, जेएन 1 व्हेरीयंटचा शिरकाव देशात झाल्यानंतर पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढल्याचे चित्र आहे. त्यामुळे अनेकांच्या मनात भीतीचे वातावरण दिसत आहे. राज्यातल्या कोरोनाच्या आकडेवारीत मागील 10 दिवसात झपाट्याने वाढली आहे. त्याचे मुख्य कारण म्हणजे पुन्हा एकदा वाढलेल्या चाचण्या. एकूण सुरुवातीला जेएन 1 व्हेरीयंटचा शिरकाव केरळ, गोव्यासह राज्यात देखील झाल्याने चाचण्यांमध्ये पुन्हा वाढ करण्यात आली आहे.
 
सोबतच, श्वसनाचे विकार असलेल्यांचे सर्व्हेक्षण देखील केले जात आहे. त्यामुळे राज्यातल्या अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्येचा आकडा मागील दहाच दिवसात तिप्पट गेलाय. सोबतच, जेएन१ व्हेरीयंटच्या रुग्णसंख्या देखील वाढ झाली असून येत्या काही दिवसात यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
 
सर्वाधिक रुग्ण ठाण्यात
20 डिसेंबर रोजी सिंधुदुर्गात जेएन 1 व्हेरीयंटच्या रुग्णाची नोंद झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. 24 डिसेंबर रोजी 9 जेएन1 व्हेरीयंटच्या रुग्णांची राज्यात नोंद झाल्याचं सांगितलं. ठाणे पालिका हद्दीत –5, पुणे पालिका हद्दी2, तर पुणे ग्रामीण, अकोला पालिका हद्द आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी एका रुग्णाची नोंद झालीय. दरम्यान, दिलासादायक बाब म्हणजे हे सर्वच दहाही रुग्ण बरे झाल्याची माहिती आहे.
 
Edited By-Ratnadeep Ranshoor