गुरूवार, 9 जानेवारी 2025
  1. वृत्त-जगत
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2015
Written By
Last Modified: ऑकलंड , बुधवार, 25 मार्च 2015 (16:51 IST)

... तर ऑस्ट्रेलियाला न हरवता टीम इंडिया अंतिम फेरीत

सिडनीत लहरी हवामानावर चर्चेचे फड रंगले आहेत. चर्चा या मुद्यावर होते आहे की, जर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील 26 मार्चच्या सामन्यात, म्हणजे उपांत्यफेरीत पावसाचे पाणी फिरले, तर काय होईल? मंगळवारी सिडनीत पाऊस झाल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे.  

भारताजवळ मौका 
तसे पाहिले तर यासाठी आयसीसीने नॉक आऊटवर एक उपाय ठेवला आहे, रिझर्व डे ठेवण्यात आला आहे. जर हा सामना पावसामुळे 26 मार्च रोजी खेळता आला नाही, तर तो 27 मार्च रोजी खेळवला जाईल, पण पुढचा सर्वात महत्वाचा प्रश्न असा आहे, जर हा सामना 27 मार्च रोजीही पावसामुळे खेळता आला नाही तर मग काय? या प्रश्नाचे उत्तर भारताच्या बाजूने असू शकते, कारण  अशी परिस्थितीत निर्माण झाली तर भारताला अंतिम फेरीत प्रवेश मिळेल, कारण लीग सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियापेक्षा भारताने चांगली खेळी केली आहे. भारत आपल्या पूलमध्ये आघाडीवर आहे, तर ऑस्ट्रेलिया पूल ए मध्ये दुसर्‍या स्थानावर आहे.