सोमवार, 11 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2019
Written By
Last Updated : मंगळवार, 28 मे 2019 (15:49 IST)

ICC चे हे 7 नियम वर्ल्डकप स्पर्धेत पहिल्यांदाच लागू होतील

क्रिकेट वर्ल्ड कपचा 12वा संस्करण ग्लंड-वेल्समध्ये 30 मे पासून सुरू होईल. यावेळी फक्त 10 संघ स्पर्धेत भाग घेणार आणि नवीन नियम देखील लागू केले जात आहे.
 
प्रत्यक्षात मागील वर्ल्ड कप 2015 मध्ये खेळला गेला होता पण त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ICC ने 7 नवीन नियम लागू केले. यामुळे 4 वर्षांनंतर 2019 वर्ल्ड कपमध्ये हे सर्व नियम लागू होतील. तसे, हे नियम एकदिवसीय सामन्यांमध्ये लागू केले गेले आहे, पण वर्ल्ड कप सारख्या मोठ्या स्पर्धेत हे नियम पहिल्यांदाच लागू होतील.
 
तर जाणून घ्या या 7 नियमांबद्दल:
 
1. हेल्मेट वरून आऊट, पण हॅंडल द बॉल नॉट आऊट.
 
2. जर वाईट वागणूक असेल तर अंपायर खेळाडूला बाहेर काढू शकतो.
 
3. अंपायर कॉलवर रिव्यू खराब होणार नाही.
 
4. चेंडू दोनदा बाऊंस झाली तर नो बॉल ठरेल.
 
5. चेंडू ऑन द लाइन असल्यावर ही रनआउट मानले जाईल.
 
6. बॅटची रुंदी आणि लांबी देखील निश्चित केली गेली आहे.
 
7. लेग बाय आणि बायचे रन वेगळ्याने जुळतील.