शनिवार, 23 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. क्रिकेट मराठी
  3. क्रिकेट वर्ल्डकप 2019
Written By
Last Modified: शनिवार, 15 जून 2019 (16:47 IST)

सचिन ने दिला भारतीय संघाला हा सल्ला असे हरवा पाकीस्थानला

भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक खेळातील शत्रूच आहेत. भारताचा विश्वचषकातील सामना रविवार 16 जून रोजी होत असून, सर्व जगाचे लक्ष या सामन्याकडे लागले आहे. क्रिकेटविश्वाचं लक्ष लागलेल्या या सामन्यात कोण जिंकणार याचीच चर्चा सर्वत्र सुरु झाली आहे. टीम इंडिया विश्वचषकातील आपला विक्रम कायम ठेवणार  की सरफराज अहमदची पाकिस्तानी टीम बाजी मारणार हे पाहणं आता उत्सुकता वाढवणारे झाले आहे. आपल्या संघाने विश्वचषकात दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया या दिग्गज संघाना हरवून जोरदार सुरुवात केली होती, मात्र न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा सामना पावसाने रद्द झाला होता. मात्र  भारटाचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. त्यामुळे आता आपला जगविख्यात खेळातू सचिन भारताच्या मागे उभा राहिला आहे. पाकला हरवायला त्याने टीम इंडियाला चांगला सल्ला दिला आहे. सचिन म्हणतो की पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीर हा भारतासाठी घातक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याच्यापासून सतर्क रहावे लागणार आहे. मात्र त्याच्या गोलंदाजीला आक्रमकपणे सामोरं जा त्याला सर्व ताकदीने उत्तर द्या असा सल्ला सचिनने कोहलीला दिला आहे. मोहम्मद आमीरने विश्वचषकात सर्वाधिक 10 विकेट्स घेत प्रथम  स्थान मिळवले आहे.  ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात तर केवळ 30 धावा देत आमीरने 5 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे सचिनचा हा आक्रमक होण्याचा सल्ला भारतासाठी महत्वाचा ठरणार आहे.