सोमवार, 6 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. दीपावली
Written By
Last Modified: रविवार, 16 ऑक्टोबर 2022 (17:14 IST)

Chitragupta Puja : भाऊबीजेच्या दिवशी भगवान चित्रगुप्ताची पूजा या मंत्रांनी करा ,भगवान प्रसन्न होतील

भगवान चित्रगुप्त हे यमराजाचे सहायक देवता मानले जातात. भगवान चित्रगुप्त प्रत्येक व्यक्तीच्या जन्मापासून ते मृत्यू पर्यंत त्याच्या कर्माचा हिशेब ठेवतात. कार्तिक शुद्ध द्वितीयेला भगवान चित्रगुप्ताची पूजा केली जाते. हिंदू धर्मात चित्रगुप्ताच्या पूजेला विशेष महत्त्व आहे.
चित्रगुप्त पूजेचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.
 
भगवान चित्रगुप्त हे ब्रह्मदेवाचे अपत्य. जेव्हा ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मितीं केली आणि देव-असुर, गंधर्व, अप्सरा, स्त्री-पुरुष, पशु-पक्षी इत्यादींना जन्म दिला. त्याच क्रमाने यमराजाचाही जन्म झाला. ज्यांना धर्मराज म्हणतात, कारण ते धर्माप्रमाणे प्राण्याला त्याच्या कर्माचे फळ देतात.
 
या मोठ्या कार्यासाठी यमराजांनी ब्रह्माजींकडे सहयोगी मागितला तेव्हा ब्रह्माजी ध्यानस्थ झाले आणि हजार वर्षांच्या तपश्चर्येनंतर एका पुरुषाचा जन्म झाला. ज्यांना आपण भगवान चंद्रगुप्त म्हणून ओळखतो. यांचा जन्म ब्रह्माजींच्या कायेतून झाला होता म्हणून त्यांना कायस्थ असेही म्हणतात. यमद्वितीयेच्या दिवशी यम आणि यमुना यांच्या पूजेबरोबरच भगवान चित्रगुप्ताची विशेष पूजा केली जाते. कारण, भगवान चित्रगुप्त हे यमराज यांचे सहाय्यक आहेत. 
 
भगवान चित्रगुप्ताला दोन बायका होत्या. त्यापैकी एक ब्राह्मण आणि दुसरी क्षत्रिय होती. या कारणामुळे कायस्थांमध्ये ब्राह्मण आणि क्षत्रिय हे दोन्ही गुण आढळतात.या दिवशी भगवान चित्रगुप्ताची पूजा करतात व्यवसायाशी निगडित लोकांसाठी चित्रगुप्तांच्या पूजेचं खूप महत्त्व आहे. या दिवशी नवीन वहीखात्यांवर ‘श्री’ लिहून काम सुरु केले जाते. लेखणी-शाई याला फार महत्त्व आहे. व्यक्तीचे उत्पन्न आणि खर्च यांचा तपशील लिहून कुटुंबातील मुलांची संपूर्ण माहिती भगवान चित्रगुप्ताला अर्पण केली जाते. एका साध्या कागदावर आपली इच्छा लिहून आणि पूजेदरम्यान भगवान चित्रगुप्ताच्या चरणी अर्पण करावी. चित्रगुप्त पूजेचे विधी प्रामुख्याने पुरुष करतात आणि संपूर्ण कुटुंब एकत्र पूजा करतात.
 
 उपासना पद्धत-
सकाळी स्नान केल्यानंतर संपूर्ण कुटुंबाने घरातील मंदिरात एकत्र उपस्थित राहून चित्रगुप्ताच्या मूर्ती किंवा तसवीरी समोर बसावे.
चित्र उपलब्ध नसेल तर कलश हे प्रतीक मानून भगवान चित्रगुप्ताची पूजा करू शकता.
 
पूजेचे ताट सजवा. ताटात कुंकू, अक्षत, फुले, हळद, चंदन, गूळ, दही, अत्तर, कपडे, कलावा  , शेणाच्या काड्या, हवन साहित्य, कापूर, मिठाई इत्यादी ठेवा.
 
गंगाजल शिंपडून, दिवा आणि उदबत्ती लावून जागा स्वच्छ करा. चित्रगुप्तजींना हळद आणि कुंकू अक्षत व्हा. त्यानंतर सर्वप्रथम गणेशाची पूजा करावी.
 
आता कुटुंबप्रमुखाने साध्या कागदावर 'ओम चित्रगुप्ताय नमः' लिहून उरलेल्या कोऱ्या कागदावर राम राम राम राम राम लिहून तो भरा. यानंतर कुटुंबातील इतर सदस्ययांनी देखील असेच करायचे.
 
यानंतर दुसऱ्या साध्या कागदावर कंकूने स्वस्तिक बनवा. त्यानंतर पाच देवतांची नावे लिहा. खाली एका बाजूला तुमचे नाव, पत्ता आणि तारीख लिहा. कागदाच्या दुसऱ्या बाजूला तुमचे उत्पन्न आणि खर्च यांचा संपूर्ण तपशील द्या. देवाला तुमची इच्छा सांगून, पुढील वर्षासाठी सुख ऐश्वर्या मिळण्याची प्रार्थना करा. या विनंतीच्या तळाशी तुमचे नाव लिहा.मसीभाजन संयुक्तश्चरसित्वं! महीतले. लेखनी- कटिनीहस्त चित्रगुप्त नमोऽस्तुते. चित्रगुप्त! नमस्तुभ्यं लेखकाक्षरदायकम्. कायस्थजातिमासाद्य चित्रगुप्त! नमोऽस्तुते, हा मंत्र देखील लिहावा.मनोभावे भगवान चित्रगुप्त यांना प्रार्थना करून आपली इच्छा सांगावी. 
आता भगवान चित्रगुप्ताचे ध्यान करताना या मंत्राचा 5,7 किंवा 11 वेळा जप करा...
 
“”मसीभाजन संयुक्तश्चरसि त्वम्! महीतले।
लेखनी कटिनीहस्त चित्रगुप्त नमोस्तुते।।
चित्रगुप्त! मस्तुभ्यं लेखकाक्षरदायकं।।
कायस्थजातिमासाद्य चित्रगुप्त! नमोस्तुते।।
 
या मंत्राचा जप केल्यानंतर सर्वांनी मिळून चित्रगुप्तजींची आरती करावी.
 
Edited By - Priya Dixit