रविवार, 26 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

आवळ्याचे सूप

ND
साहित्य : 250 ग्रॅम आळवे, 400 ग्रॅम टोमॅटो, दोन चमचे टोमॅटो प्युरी, 1 मोठा चमचा तूप, 1 लहान चमचा कांदा, 30 ग्रॅम मैदा, चवीनुसार मीठ, काळेमिरे, आवश्यकतेनुसार पाणी, बारीक चिरलेली कोथिंबीर.

कृती : सर्वप्रथम आवळ्यांना किसून घ्यावे. एका पातेल्यात थोडंसं पाणी गरम करावे, त्यात चवीनुसार मीठ घालावे. आता त्यात आवळाचा कीस घालून नरम होईपर्यंत शिजवावे. शिजल्यानंतर आवळे व पाणी वेगवेगळे गाळून घ्यावे. कांदे व टोमॅटो बारीक कापून घ्यावे. एका मोठ्या पॅनमध्ये तूप घालून घालून कापलेला कांदा घालून कमी आचेवर परतून घ्यावे. नंतर त्यात मैदा टाकून मिश्रण चांगले हालवावे. आता त्यात चिरलेले टोमॅटो आणि टोमॅटोची प्युरी घालून 15 मिनिट शिजवावे. आता टोमॅटोचे मिश्रण व किसलेल्या आवळ्यांना मिक्सरमधून काढून घ्यावे. तयार सुपामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालावे. मीठ व काळेमिरे घालून कोथिंबीरीने सजवून सर्व्ह करावे.