रविवार, 12 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|

हरबर्‍याचे सूप

MHNEWS
साहित्य - हरबर्‍याची पाने धुऊन शिजवून केलेली पेस्ट दीड वाटी, टोमॅटो शिजवून सालं काढून केलेली पेस्ट (पल्प) १ वाटी, कांदा कीस अर्धी वाटी, मैदा २ चमचे, जिरेपूड १ चमचा, लोणी २ चमचे, मीरेपूड, मीठ चवीनुसार, ओले हरबरे दाणे (शिजलेले) अर्धी वाटी, क्रीम अर्धी वाटी.

कृती - गॅसवर भांड्यात लोणी गरम करून त्यात कांदा कीस परता. त्यातच मैदा परता. नंतर पाने व टोमॅटोची पेस्ट, मीठ, मीरेपूड,
कोथिंबीर पेस्ट व हरबरा दाणे घालून मंद गॅसवर उकळा. सर्व्ह करताना बाऊलमध्ये क्रीम घाला.