सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. खाद्य संस्कृती
  4. »
  5. ग्लासातल्या ग्लासात
Written By वेबदुनिया|
Last Modified: सोमवार, 2 मे 2011 (16:23 IST)

हिरव्या द्राक्षांची सरबत

WD
बिना बियांची हिरव्या रंगाची द्राक्षे घेऊन रस काढावा तो १पाव लिटर, अर्धा किलो साखर, पाव लिटर पाणी, १ चमचा सायट्रीक अ‍ॅसिड, पाव चमचा हिरवा रंग, पाव चमचा पिवळा रंग व द्राक्षाचे इसेन्स अर्धा चमचा.

कृती- द्राक्ष स्वच्छ धुवून सुटी करून जाड बुडाच्या पातेल्यात घालून लाकडी रवीने ठेचावित. नंतर मंद आचेवर ५-१० मिनिट शिजवावीत. यामुळे रस जास्त निघतो. नंतर तो मिक्सरमधून बारीक करावा. गाळून रस काढावा. नंतर बेसिक कृतीत दिल्याप्रमाणे साखरेचा पाणी टाकून पक्का पाक करून थंड झाल्यावर द्राक्षाचा रस टाकावा. पुन्हा उकळून गाळून सायट्रीक अ‍ॅसिड व इसेन्स व रंग टाकून थंड झाल्यावर प्रिझर्व्हेटीव्ह टाकून बरणीत भरावा. फ्रीज असल्यास फ्रीजमध्ये ठेवावा. उन्हाळ्यात वेळेवर थोडे पाणी टाकून बर्फ टाकून सर्व्ह करता येईल. हे टिकाऊ सरबत आहे. काळ्या द्राक्षाचे ह्याचप्रमाणे टिकाऊ सरबत करता येईल.