गुरूवार, 2 जानेवारी 2025
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By वेबदुनिया|

पोटेटो रोस्टी

साहित्य : 250 ग्रॅम बटाटे, 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरलेल्या, 1/4 कप बारीक चिरलेली कोथिंबीर, चवीनुसार काळेमिरे पूड व मीठ, 50 ग्रॅम पनीर, 2 चमचे लोणी.

कृती : सर्वप्रथम बटाट्यांना अर्धवट उकळावे व त्याची सालं काढून त्यांचा किस करून घ्यवा. नंतर त्या हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ व काळेमिरे पूड घालून मिश्रणाला एकजीव करावे. एक नॉन स्टिक पॅन गरम करून त्यात धिरड्यासारखे मिश्रण पसरावे व चारी बाजूने लोणी सोडून दोन्ही भाजूने परतून घ्यावे. सर्व्ह करताना वरून ‍पनीर टाकावे व उपासाच्या चटणीसोबत सर्व्ह करावे.