शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. नैवैद्य
Written By वेबदुनिया|

पनीर मावा मोदक

सामग्री- दोन वाट्या खवा, अर्धा वाटी पनीर, दोन वाट्या पिठी साखर, केशर, इलायचीची पूड, सुकामेवा, खोबर्‍याचा कीस व चांदी वर्ख.

पद्धत- पनीर हातांनी चांगले कुसकुरून घ्या. दोन ते तीन मिनिट त्याला चांगले भाजून घ्या. त्यानंतर त्याला पिवळा रंग चढेल.

त्याला थंड झाल्यानंतर त्यात दोन चमचे साखर मिसळा व त्याचे लहान लहान गोळे तयार करा. मावा सुकल्यानंतर त्यात इलायची पूड व साखर मिसळा व पनीरच्या गोळ्यांच्या संख्येत गोळे तयार करा. माव्याचा एक गोळा हातावर ठेवा व त्याला चपटे करा. त्यावर पनीरचा पिवळा गोळा ठेवून त्याचा एक गोळा तयार करून त्याला मोदकाचा आकार द्या. त्यावर चांदी वर्ख व केशर लावून सजवा.