सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By
Last Modified: शनिवार, 7 सप्टेंबर 2024 (06:00 IST)

Ganesh Chaturthi Wishes 2024 गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा

lord ganesh AI
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा
सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 
गणेश चतुर्थीचा दिवस आहे खास
लंबोदराचा घरात आहे निवास
दहा दिवस आहे आनंदाची रास
अनंत चतुर्थीला मात्र मन होते उदास
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गणपती बाप्पा मोरया!
 
बाप्पाचा आशीर्वाद नेहमी तुमच्यावर असावा
आणि तुमचा चेहरा सदैव हसरा दिसावा हीच इच्छा
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
गजानन तू गणनायक असा विघ्नहर्ता तू विघ्नविनाशक
तूच भरलास त्रिभुवनी अन् उरसी तूच ठायी ठायी
जन्मची ऐसे हजारो व्हावे, ठेविण्या मस्तक तूज पायी
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 
मोदकांचा केला प्रसाद
केला लाल फुलांचा हार
मखर झाले नटून तयार
आले वाजत गाजत बाप्पा
गुलाल फुले अक्षता उधळे
बाप्पाच्या आगमनासाठी जमले सगळे
सर्व गणेश भक्तांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
 
मोरया मोरया मी बाळ तान्हे
तुझीच सेवा करू काय जाणे
अन्याय माझे कोट्यानुकोटी
मोरेश्वरा बा तू घाल पोटी
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 
तुमच्या आयुष्यातला आनंद
गणेशाच्या पोटा इतका विशाल असो
अडचणी उंदरा इतक्या लहान असो
आयुष्य सोंडे इतके लांब असो
क्षण मोदका इतके गोड असो
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा
 
पाहूनी ते गोजिरवाणं रूप
मोह होई मनास खूप
ठेवण्या तुज हाती मोदक प्रसाद
होते सदैव बाप्पा तुझ्या दर्शनाची आस
गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा
 
तूच सुखकर्ता तूच दुःखहर्ता
अवघ्या दिनांचा नाथा
बाप्पा मोरया रे, बाप्पा मोरया रे
चरणी ठेवितो माथा
गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा