सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. गुढीपाडवा
Written By
Last Updated : मंगळवार, 9 एप्रिल 2024 (06:58 IST)

Gudi Padwa Rangoli Designs 2024 : गुढीपाडवा रांगोळी डिझाईन

कोणत्याही सणाला रांगोळी काढण्याचे महत्त्व आहे. रांगोळी शिवाय सणासुदीची पूर्णता नसते. हिंदू धर्मातील महत्त्वाचा सण म्हणजे 'गुढी पाडवा' चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजरा केला जाणारा हा सर्वात मोठा सण आहे. या दिवसापासून हिंदू नवीन वर्षारंभ होतो. झाडांना नवी पालवी फुटतात. नवीन स्वप्न नवीन ध्येय घेऊन पुढे वाटचाल करण्याची सुरुवात करणारा दिवस म्हणजे गुढी पाडवा आहे. या दिवसापासून हिंदूचे नवीन संवत्सर बदलते. या दिवशी घरोघरी गुढी उभारतात. या दिवशी प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणावर विजय मिळवला. या दिवशी घरो घरी गुढी उभारून दाराबाहेर मोठ्या रांगोळ्या काढतात.गुढी चा अर्थ तेलगू भाषेत काठी आहे. तर काही भागात याचा अर्थ तोरण असा देखील होतो. गुढी पाडव्याला गुढी पुढे तसेच दाराबाहेर अंगणात रांगोळी काढतात.हा सण मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा  केला जातो .
 
आज आम्ही आपल्याला गुढीपुढे आणि दारापुढे काढणाऱ्या काही रांगोळ्यांचे डिझाईन सांगत आहोत. आजकाल घर लहान असल्यामुळे रांगोळी काढायला जागाच नसते. तरी ही कमी जागेत काढण्यासारख्या रांगोळीचे काही सोपे डिझाईन सांगत आहोत.
 
1 पाना फुलांची रांगोळी - पाना फुलांशिवाय कोणत्याही रांगोळीची पूर्णता नाही. आपल्याला साधी सोपी रांगोळी काढायची असल्यास पानाफुलांची ही सोपी रांगोळी काढू शकता.
 

 
2 जाड ठिपक्यांची  रांगोळी- आपण पेन ने जाड ठिपके देऊन किंवा हातानेच जाड ठिपके देऊन ही सोपी रांगोळी काढू शकता. 
 
3 मोराची सोपी रांगोळी- आपण फ्री हँड मोराची रांगोळी देखील काढू शकता. ही रांगोळी चटकन काढली जाते. 
 
4 संस्कार भारतीची रांगोळी - संस्कार भारती रांगोळी काढणे ही एक कला आहे. आजकाल रांगोळी काढण्यासाठी पेन, झाकण, बाटल्या, जाळी, असे साहित्य मिळतात. या मुळे रांगोळी काढायला सोपे जाते. संस्कार भारती रांगोळ्यांचे सोपे  डिझाईन काढून आपण रांगोळीची सुरुवात करू शकता. 
 
5 गोल रांगोळी - ही रांगोळी काढायला सोपी आहे. आपण फ्री हॅन्ड ने गोल रांगोळी काढू शकता. या साठी ताट किंवा गोलाकार कोणत्याही साहित्याचा वापर करू शकता. गोलाकार काढून आपल्या आवडीनुसार रंगांनी रंग भरा. 
 
6 चैत्रांगण - आपण चैत्रांगणाची ही रांगोळी देखील काढू शकता. याला सरावाची गरज असते. थोड्याश्या सरावाने आपण ही रांगोळी सहज काढू शकता.


Edited By- Priya Dixit