शुक्रवार, 10 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. हनुमान जयंती
Written By
Last Modified: शनिवार, 4 एप्रिल 2020 (11:42 IST)

हनुमान जयंती विशेष, जाणून घ्या मारुतीला हनुमान का म्हणतात

दर वर्षी चैत्र पौर्णिमेला सूर्योदयाच्या वेळीस हनुमान जयंती साजरी केली जाते. हा हिंदूंचा सण आहे. चैत्र महिन्यातील पौर्णिमेला महाबली हनुमान यांचा जन्म सूर्योदयाला झाला होता. हा दिवस हनुमान जयंती म्हणून साजरा केला जातो. या संदर्भात आख्यायिका आहे. ज्या वेळी विष्णूंनी कृष्ण अवतार घेतला होता त्या नंतर रावणाला दिव्य शक्ती प्राप्त झाली. त्याने आपल्या मोक्ष प्राप्तीसाठी शंकरा कडून वर मागितले. त्यावेळी शंकराच्या मोक्षप्राप्तीसाठी एक लीला रचली. ह्या लीलेत त्यांनी हनुमानाच्या रूपात अवतार घेतले. त्यामुळे रावणाला मोक्ष मिळावे. यासाठी प्रभू श्रीरामाच्या बरोबरच हनुमान अवतारात स्वयं देवाधिदेव शंकर असत.
 
या दिवशी लोक मारुतीच्या दर्शनास देऊळात जातात. मारुती बाळ ब्रह्मचारी होते त्यामुळे त्यांना जानवं घातले जाते. मारुतीच्या मूर्तीला शेंदूर लावण्याची प्रथा देखील आहे.  रुईची फुले वाहतात. नारळ फोडण्याची प्रथा पण आहे. अशी आख्यायिका आहे की रामाच्या दीर्घायुष्यासाठी मारुतीने आपल्या शरीरावर शेंदरी लेप लावले होते. त्या दिवसांपासून त्यांना शेंदरी लेप लावले जाते. ह्याला चोळा म्हणतात. 
 
तसेच दक्षिणमुखी मारुतीच्या मूर्तीसमोर जप करण्याचे अत्यंत महत्त्व आहे. या दिवशी देऊळात मारुती चालीसा, सुंदरकाण्ड पठण केले जाते. अन्नाकुटाचे आयोजन करण्यात येते. तामिळनाडू आणि केरळात हनुमान जयंती मार्गशीर्ष महिन्यातील अवसेला आणि ओडिशामध्ये वैशाखाच्या महिन्यात साजरी केली जाते. कर्नाटक आणि आंध्रप्रदेशात  चैत्र पौर्णिमेपासून वैशाखाच्या महिन्यातील हा उत्सव 10 दिवस साजरा केला जातो.