1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. हनुमान जयंती
Written By
Last Modified: सोमवार, 26 एप्रिल 2021 (11:45 IST)

Hanuman Jayanti 2021 : 8 शुभ वरदान ज्यामुळे हनुमान बनले सामर्थ्यवान

वाल्मीकी रामायणाप्रमाणे लहानपणी जेव्हा हनुमान सूर्यदेवाला फळं समजून खाण्यास निघाले होते तेव्हा घाबरुन देवराज इंद्रानी हनुमानावर वज्र प्रहार केला. त्यामुळे हनुमान बेशुद्ध पडले. हे बघून पवन देव क्रोधित झाले आणि त्यांनी सर्व जगातील वायु प्रवाह थांवबून दिला. जगात हाहाकार झाला. तेव्हा परमपिता ब्रह्मांनी हनुमानाला शुद्धीत आणले. तेव्हा सर्व देवी-देवतांनी हनुमानाला वरदान दिले. हे वरदान मिळाल्यामुळे ते परम शक्तीशाली झाले.
 
जाणून घ्या त्यांना कोणते 8 शुभ वरदान मिळाले-
 
1. सूर्य देवताने हनुमानाला आपल्या तेजस्वी गुणाचा शंभरावा भाग प्रदान करत म्हटलं की जेव्हा यांच्यात शास्त्र अध्ययनाची शक्ती येईल तेव्हा मी यांना शास्त्राचे ज्ञान देईन. यामुळे हे चांगले वक्ता होतील आणि शास्त्रज्ञानात यांची बरोबरी करणारा नसेल.
 
2. धर्मराज यमाने हनुमानाला वर दिले की ते दण्डाने अवध्य आणि निरोगी राहतील.
 
3. कुबेरने वरदान दिले की याला युद्धात पराभव बघावा लागणार नही आणि माझी गदा संग्रामामध्ये देखील याचा वध करु शकणार नाही.
 
4. भगवान शंकरांनी वर दिले की हा माझ्या आणि माझ्या शस्त्रांद्वारा अवध्य राहील.
 
5. देव शिल्पी विश्वकर्मा यांनी वरदान दिले की माझ्या द्वारा निर्मित सर्व शस्त्रांपासून हे अवध्य आणि चिरंजीवी राहतील।
 
6. देवराज इंद्र यांनी हनुमानाला वर दिले की हा बालक आजपासून माझ्या वज्र द्वारा देखील अवध्य राहील.
 
7. जलदेवता वरुण यांनी वर दिले की दहा लाख वर्षाचे वय झाल्यावर देखील माझ्या पाश आणि जल यामुळे याचा मृत्यू होणार नाही.
 
8. परमपिता ब्रह्मा यांनी हनुमानाला वर दिले की हा बालक दीर्घायु, महात्मा आणि सर्व प्रकाराच्या ब्रह्मण्डांनी अवध्य राहील. युद्धात याचा पराभव शक्य नसेल. हा आपल्या इच्छेनुसार रुप धारण करु शकेल, जेथे मर्जी जाऊ शकेल. याची गती आपल्या इच्छेनुसार तीव्र किंवा मंद असेल.