शुक्रवार, 3 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. विधानसभा निवडणूक 2024
  3. हरियाणा विधानसभा निवडणूक 2024
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑक्टोबर 2024 (14:05 IST)

राजकारणाच्या आखाड्यात क्‍वॉलिफाय कुस्तीपटू विनेश फोगट

भाजपचे माजी खासदार आणि कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रजभूषण सिंह शरण यांच्या विरोधात केलेल्या आंदोलनामुळे प्रसिद्धीझोतात आलेली कुस्तीपटू विनेश फोगट हिने हरियाणा निवडणुकीत आपली चुणूक दाखवली आहे. जुलाना मतदारसंघातून त्या 5 हजार 763 मतांनी विजयी झाल्या आहेत. त्यांनी भाजपच्या योगेश कुमार यांचा पराभव केला. फोगट हे जुलाना मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवत होत्या.
 
हरियाणा विधानसभेच्या या जागेवर सर्वांच्या नजरा खिळल्या होत्या. ही हॉट सीट आहे. विनेश फोगटला ऑलिम्पिकमध्ये अपात्र ठरवण्यात आले होते, मात्र ती निवडणूक रिंगणात पात्र ठरली आहे.
 
काय आहे जागेचा इतिहास: जुलाना जागेवर गेल्या विधानसभा निवडणुकीत जननायक जनता पक्षाचे अमरजीत दंडा यांना 61.942 मते मिळाली होती. त्यांनी भाजपचे परमिंदर सिंग धुल यांचा पराभव केला होता. परमिंदर सिंग यांना 37,749 मते मिळाली. काँग्रेसचे धर्मेंद्र सिंह धुल यांना 12,440 मतांवर समाधान मानावे लागले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही काँग्रेस उमेदवाराला 23 हजार मतांनी पराभव स्वीकारावा लागला होता. 2009 च्या निवडणुकीतही काँग्रेसला पराभवाला सामोरे जावे लागले होते.