रविवार, 1 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

31 जानेवारीला षट्तिला एकादशी, तिळाचे महत्त्व व पूजा विधी

षट्तिला एकादशीला तिळ वापरून विष्णूंची पूजा अर्चना केल्याने मनोकामना पूर्ण होतात. या एकादशीला तीळ वापरून स्नान, नैवेद्य, दान, तरपण करण्याची परंपरा आहे. या दिवशी तिळाने प्रभू विष्णूंची पूजा करावी व पिवळे फळ, फुलं व वस्त्र अर्पित करावे. या दिवशी तीळ वापरल्याने पुण्य प्राप्ती होते आणि मनातील इच्छा देखील पूर्ण होतात. या दिवशी अधिकाधिक तिळाचा वापर केल्याने दीर्घायुष्य प्राप्त होतं असे ही मानले गेले आहे.

तिळाच्या सहा प्रकारामुळे ही एकादशी षट्तिला एकादशी म्हणून ओळखली जाते.
1. तीळ स्नान, 2. तीळ उटणे, 3. तीळ हवन, 4. तीळ तरपण, 5. तीळ भोजन, 6. तीळ दान हे तिळाचे सहा प्रकार आहे. आणि हे व्रत केल्याने अनेक पाप नष्ट होतात आणि मनुष्याला मोक्षाची प्राप्ती होते.

तर जाणून घ्या या दिवशी काय करावे ते:
 
या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून तिळाचे उटणे लावा.
अंघोळीच्या पाण्यात तीळ मिसळून स्नान करा.
हलक्या पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा.
पूर्व दिशेला तोंड करून पाच मूठ तिळांनी 108 वेळा ॐ नमो भगवते वासुदेवाय मंत्राने आहुती द्या.
योग्य विद्वान व्यक्ती किंवा ब्राह्मणाच्या सल्ल्याने दक्षिण दिशेकडे तोंड करून पितरांना तिळाने तरपण करा.
या दिवशी अन्न सेवन करू नये. संध्याकाळी तिळाच्या पदार्थांचा नैवेद्य दाखवा.
तिळाचे पदार्थ गरजू व्यक्तीला दान करा.
 
काय करणे टाळावे
या दिवशी तामसिक भोजन करणे टाळावे.
एकादशी व्रत दरम्यान स्वच्छ वस्त्र परिधान करावे.
पूजा आणि कथा दरम्यान कुटुंबातील वातावरण शांत असावे.
व्रत करणार्‍यांनी कमीत कमी भाषण करावे. खोटं मुळीच बोलू नये. निंदा करू नये.
मोठ्यांचा अपमान करू नये. 
काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार इतर गोष्टींचा त्याग करून देवाच्या चरणी उपासना करावी.