मंगळवार, 18 मार्च 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 18 मार्च 2025 (06:00 IST)

महिलांनी मारुतीची पूजा करावी की नाही ? प्रेमानंद महाराज काय म्हणतात जाणून घ्या

मारुती बाल ब्रह्मचारी असल्याचे म्हटले जाते, म्हणून त्यांच्या पूजेबद्दल अनेक युक्तिवाद केले जातात. काही म्हणतात की स्त्रियांनी त्यांची पूजा करावी, तर काही म्हणतात की महिलांची त्यांनी पूजा करू नये. तथापि महिला अनेकदा मंदिरांमध्ये बजरंगबलीची पूजा करताना दिसतात. दरम्यान प्रेमानंद महाराजांचे व्हायल होत असलेल्या व्हिडिओंपैकी एका व्हिडिओत ते याबद्दल माहिती देत असताना दिसत आहे. ज्यामध्ये ते सांगत आहे की महिलांनी पूजा करावी की नाही? जर आपण पूजा करत असाल तर त्याचे नियम काय असावेत? 
 
तर जर तुम्हीही हनुमान भक्त असाल तर संकट मोचनची पूजा करण्याचा योग्य मार्ग कोणता आहे ते जाणून घेयचे असेल तर हा लेख नक्की वाचा.
 
महिलांनी हनुमानाची पूजा का करू नये?
एका भक्ताने प्रेमानंद महाराजांना हा प्रश्न विचारला की महिलांनी हनुमानजींची पूजा करू नये का? त्यांनी मूर्तीजवळ का जाऊ नये? यावर प्रेमानंद महाराज म्हणाले की हनुमानजींच्या मूर्तीजवळ जाणे हीच एकमेव भक्ती आहे का? जर असे म्हटले जाते की मूर्तीजवळ जाऊ नये, तर तिथे जाऊन भक्ती करणे आवश्यक नाही. भक्ती ही मनापासून येते, दिखाव्याने नाही.
बाल ब्रह्मचारी आहे हनुमान
प्रेमानंद महाराजांनी उदाहरण देत म्हटले की हनुमान हे बाल ब्रह्मचारी आहे. ब्रह्मचर्यात कोणत्याही स्त्रीचा स्पर्श वर्ज्य आहे. अशात महिलांनी मारुतीला स्पर्श करु नये. जर कोणी हे जाणूनबुजून केले तर तो स्वतः त्यासाठी दोषी असेल.
 
मग महिलांनी कशा प्रकारे पूजा करावी?
प्रेमानंद महाराज म्हणाले की, हनुमानजींची पूजा फक्त त्यांना स्पर्श करूनच करावी असे नाही. देव भावनांमध्ये अस्तित्वात आहे आणि त्यांची भक्तीने पूजा करता येते. जर हनुमानजी एखाद्या महिलेच्या विचारात असतील तर तिला कोणीही रोखू शकत नाही. परंतु प्रत्येक महिलेने मारुतीशी संबंधित बाब स्वीकारली पाहिजे आणि ब्रह्मचर्य पाळले पाहिजे. जर तुम्ही त्यांची भक्तीभावाने पूजा केली तर तुम्हाला ते करण्यापासून कोणीही रोखू शकत नाही.
तसेच बजरंगबली सर्व वयोगटातील महिलांना आपली आई मानतात. म्हणून काही विद्वान लोकांच्या मते महिलांनी त्यांच्यासमोर डोकेही टेकवू नये. केवळ दोन्ही हात जोडून नमस्कार करावा.
 
अस्वीकरण: येथे दिलेली माहिती ज्योतिषशास्त्राच्या श्रद्धेवर आधारित आहे आणि ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. वेबदुनिया याची पुष्टी करत नाही.