गुरूवार, 14 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : रविवार, 4 ऑगस्ट 2024 (10:05 IST)

Ashadhi Amavasya 2024 दीप अमावस्या 2024 कधी आहे, योग्य पूजा पद्धत जाणून घ्या

deep amavasya
आषाढी एकादशीपासून प्रभू विष्णू निद्रासनात जातात. त्याच दिवसापासून चातुर्मास सुरु होतो. चातुर्मास सुरु झाल्यानंतर पहिली अमावस्या म्हणून आषाढ अमावस्या अर्थातच दीप अमावस्या साजरी केली जाते.
 
यंदा दीप अमावस्या 4 ऑगस्टला साजरी केली जाणार आहे. यंदा श्रावण महिना 5 ऑगस्टला सुरू होणार आहे. त्यामुळे आदल्या दिवशी 4 ऑगस्टला ही दीप अमावस्या मोठ्या उत्साहात साजरी केली जाणार आहे. या अमावस्येला दर्श अमावस्या तसेच काही गटारी अमावस्या म्हणून ही ओळखतात.
 
आषाढ अमावस्येला काय करावे
घरातील दिव्यांना दूध पाण्याने धुऊन स्वच्छ करावेत
पाटावर वस्त्र घालून त्यावर दिवे ठेवावेत. त्यांची पूजा करावी
आज पासूनच पत्रीचे महत्त्व सुरू होते
आघाडा, दूर्वा, पिवळी फुले यांनी दिव्यांची पुजा करावी
गोडाचा नैवेद्य अर्पण करावा 
आपल्या घरातील लहान मुलाचे औक्षण करावे
दूर्वा ही वंश वृद्धीचे प्रतीक आहे, त्यामुळे ते ही अर्पण करून प्रार्थना करावी
या दिवशी सुवासिनी स्त्रिया घरातले दिवे घासून-पुसून एकत्र मांडतात
त्याच्या भोवती रांगोळ्या घालतात व ते दिवे प्रज्वलित करून त्याची पूजा केली जाते
पूजेमध्ये पक्वान्नांचा महानैवैद्य दाखविला जातो. त्यावेळी पुढील मंत्राने दिव्याची प्रार्थना करतात
ती प्रार्थना अशी 
‘‘दीप सूर्याग्निरुपस्त्वं तेजसां तेज उत्तमम्‌| गृहाण मत्कृतां पूजां सर्वकामप्रदो भव॥
अर्थ: 
‘‘हे दीपा, तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस. 
तेजा मध्ये तू उत्तम तेज आहेस. 
माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर.’’.
त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐकली जाते आयुरारोग्य व लक्ष्मी यांची फलप्राप्ती यामुळे होते, असं धार्मिक ग्रंथात सांगितले आहे.