बुधवार, 13 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

World Elephant Day 2023 हत्ती आणि हिंदू संस्कृती

elephant white
Elephants is traditional symbol of divinity and royalty दरवर्षी 12 ऑगस्ट रोजी जागतिक हत्ती दिन साजरा करण्यात येतो. वर्ष 2012 मध्ये पाहिल्यांदा हा दिवस साजर करण्यात आला होता. आशियाई आणि आफ्रिकी हत्तींची होत असलेल्या दुर्दशेकडे लक्ष वेधण्यासाठी ह्याची स्थापना केली होती. पण काय आपल्याला माहित आहे की भारतीय संस्कृती आणि हिंदू धर्मात हत्तींचे महत्व आणि अस्तित्व देवांच्या युगापासून आहे. चला तर जाणून घ्या हत्तींबद्दल काही रोचक पौराणिक कथा -
 
हत्ती : हिंदू मान्यता आणि संस्कृती
हत्तीचं हिंदू लोकांच्या धर्म आणि संस्कृतीमध्ये खूप पवित्र स्थान असतं. हिंदू धर्मात हत्ती शारीरिक आणि मानसिक शक्ती, प्रजनन, राजेशाही, वैभव, समृद्धी, बुद्धिमत्ता, उत्सुकता आणि बुद्धीचे प्रतीक आहे. पौराणिक कथांमध्ये ते देवांच्या रूपात किंवा वाहन या प्रतीक स्वरुपात आढळून येतात. इतिहासात राजा-महाराजांच्या राज-थाट याचे प्रतीक असो किंवा युद्धात बळ दाखवण्याचे प्रतीक. संस्कृती आणि सभ्यतेमध्ये शिल्पकारी, चित्रकारी किंवा पोषाकाचे सौंदर्य वाढवायचे ठिकाण असो किंवा आज परंपरा साजरा करताना त्यांचे पूजन करणे असो सर्वात आपल्याला हत्तीचे महत्व दिसून येईल.
 
हत्ती : श्री गणेश रूपात
गणेश ज्यांचे पूजन आपण कोणताही शुभ कार्य करण्याआधी करतो त्यांचे आणि हत्तीचे वैशिष्ट्य एकमेकांशी जोडलेले आहेत. हिंदू विद्वानांच्यामते देव गणेश ह्यांचे गजमुख याच्या प्रत्येक भागाचे प्रतीकात्मक कार्य असतात ज्या आपल्याला काही शिकवण देतात. हत्तीचे मोठे डोके श्रीगणेशाच्या असीम बुद्धीचे सूचक आहेत, त्यांचे मोठे कान काळजीपूर्वक ऐकण्यासाठी धैर्य ठेवलं पाहिजे हे शिकवतात. असं मानलं जातं की त्यांचे लहाण डोळे भविष्य पाहू शकतात आणि सत्य ओळखू शकतात. त्यांची लांब खोड चांगले आणि वाईट शोधू शकतं असा लोकांचं विश्वास आहे.
 
हत्ती : देवराज इंद्राचे वाहन
कूर्म पुराणाप्रमाणे जेव्हा समुद्र मंथन झाले तेव्हा निघालेल्या चौदा रत्नांपैकी एक 'ऐरावत' हत्ती हे देखील होते. श्वेत रंगाच्या ह्या हत्तीला पहिला हत्ती असल्याचे मानले जातं. देवराज इंद्र यांनी त्याला स्वतःचे वाहन बनवलं. तिथून हत्तींना राजेशाही शक्तीचे प्रतीक म्हटलं जाऊ लागलं. हत्तींमध्ये ऐरावतचं सर्वात मोठं स्थान असल्याचे कारण म्हणजे त्याला हत्तींचा राजा देखील मानलं जातं.
 
हत्ती : देवी लक्ष्मीचे अवतारापैकी एक
देवी लक्ष्मीला हिंदू धर्मात खूप महत्त्वाचं स्थान आहे. 'अष्टलक्ष्मी' या रुपात देखील लक्ष्मीच्या एक रुपाचे नाव 'गजलक्ष्मी' असे आहे. देवी लक्ष्मीच्या ह्या रूपात त्यांच्या दोन्ही बाजूला त्यांच्यासोबत श्वेत हत्ती आहेत जे त्यांच्यावर जल अर्पित करत असतात, कुठे - कुठे हत्तींची ही संख्या 4 देखील दिसून येते. ह्या रूपात ते तलावात कमलच्या पुष्पावर विराजमान आहेत आणि ते पद्म हस्त असतात म्हणजे त्यांच्या हातात कमळ असतात. गजलक्ष्मी ही हत्तींची देवी देखील मानले जाते आणि हे प्रजननक्षमतेचे प्रतीक आहे. हिंदू पौराणिक कथांमध्ये अशी मान्यता आहे की गजलक्ष्मीने समुद्रमंथनातून प्रकट झाल्या होत्या तेव्हा इंद्राने गमावलेली संपत्ती आणि शक्तीला पुनर्संचयित करता आली होती.