1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

या पाच घरी भिक्षा मागायचे साईबाबा

शिरडीचे साईबाबा मात्र पाच घरातून भिक्षा मागायचे आणि ती भिक्षा ते एका पात्रामध्ये कुत्रे आणि पक्ष्यांसाठी टाकत होते. ते यांच्यासाठीच भिक्षा मागायला जायचे. बाबांसाठी तर बायजा माई स्वतः: जेवण बनवायची आणि तिच्या हाताचे जेवण बाबा भक्षण करायचे.
 
 
सखाराम पाटील शेलके, वामनराव गोंदकर, बय्याजी आप्पा कोते पाटील, बायजाबाई कोते पाटील आणि नंदराम मारवाडी ह्या पाच घरातून ते भिक्षा स्वीकारायचे. ज्या पात्रात बाबा भिक्षा घेत होते त्याला कोलम्बा म्हणतात. आजही समाधी मंदिरातील पुजारी दिवसातून दोनदा बाबांना नैवेद्य अर्पित करत या कोलम्बात प्रसाद टाकतात. कोलम्बा द्वारकामाईच्या धुनीजवळ आजही पाहायला मिळतं.

याच प्रकारे शिरडीत आजही तो दगड आहे ज्यावर बाबा बसायचे. बाबा दररोज या दगडावर बसत असे. हा दगड पूर्व लेंडी बाग येथे होता. गावातील लोकं या दगडावर कपडे धुवायचे. जेव्हा लोकांच्या लक्षात आले की बाबा या दगडावर रोज बसतात तर नंतर गावकर्‍यांनी दगड द्वारकामाईत ठेवले.