शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 4 ऑगस्ट 2020 (14:16 IST)

सवाष्ण पूजन म्हणजे अप्रत्यक्ष देवीचे पूजन

आपल्या संस्कृतीत विशेषतः महाराष्ट्रात विविध व्रतवैकल्ये, कुळधर्म, उद्यापन करताना ब्राह्मण, सवाष्ण पूजन करण्याची पध्दत आहे. त्यामागे काही शास्त्र आहे का? असा प्रश्न विचारला असता साधासोपा खुलासा केला गेला तो असा

* आपला धर्म माणसात देव आहे असे सांगतो...सवाष्ण पूजन करून आपण अप्रत्यक्ष देवीचे पूजन करीत असतो.
 
* ते दान नसून पूजन आहे हे लक्षात घ्या... त्यामुळे गरजू स्त्री नाही तर अधिकारसंपन्न जेष्ठ स्त्री बोलवा.
 
* ती तृप्त असावी.... कारण तरच ती तुम्हाला मनापासून आशीर्वाद देऊ शकेलं
 
* ती निर्व्यंग, सधन, वयाने प्रौढ असणारी असावी .... तरच ती मनाने शांत असून तुम्हाला शुभेच्छा देऊ शकेल.
 
* बरेचदा माहेरवाशीण लेक किंवा नणंद सवाष्ण म्हणून बोलावली जाते... पण एक लक्षात घ्या... त्यांचा साडीचोळीचा अधिकार मुळात आहेच तुमच्या कुळावर... ते निराळे असावे.
 
* शक्यतो सवाष्ण आपल्यापेक्षा वेगळ्या कुलगोत्राची असावी.
 
* तिची आपण ओटी भरतो ती सुध्दा प्रतिकात्मक आहे...

तांदूळ... धनधान्य अभिवृद्धी
सुपारी... प्रतिष्ठा
बदाम.... बुद्धी
खारीक...आरोग्य
नाणे ... संपत्ती
हळकुंड... वंशवृध्दी
याशिवाय गजरा बांगड्या वा इतर सौभग्यालंकार आनंद आणि समाधान प्राप्तीसाठी दिले जातात.
 
* त्या सवाष्ण स्त्रीला देवी मानून सारे मनोभावे करायचे वस्तुंपेक्षा भाव महत्त्वाचे...

* अगदी सोपे सांगायचे तर ज्या स्त्री मध्ये तुम्ही देवी पाहू शकता तिला बोलवा...
 
* सदैव ध्यानात ठेवा... हे पूजन आहे... कुणाला आर्थिक मदत, केळवण, उरका पाडणे.... यांसाठी करतात तो कुलधर्म नाही.
 
साभार- सोशल मीडिया