बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: मंगळवार, 10 सप्टेंबर 2024 (19:59 IST)

महालक्ष्मीला प्रार्थना ''चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे''

चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे २
आणि दिव्य किरण तुझे २ अंतरी शिरावे
 
कुठुनि कुठे सांग जाशि २ उधळित आनंद राशि २
आळवीत, गौरवीत दीप राग भावे
चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे
 
श्रीहरिचे नाभिकमल २ ब्रह्म्याचे प्रज्ञास्थल २
तृतिय रूद्रनयन तूचि २ प्रकटिशी प्रभावे
चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे
 
शककर्त्या शुभवचनी २ प्रमदांच्या रतिनयनी २
सज्जन मन वृंदावनि किती तुला भजावे
चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे
 
तव चंचल मृदूचरणी २ सांकुर कुसुमित धरणी २
बघुनि मुदित स्थिरचर का मी उगि रहावे
चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे
 
मम जीवन घुंगुर सर २ बांधिन तव पदि सत्वर २
क्षणभरि तरि तव भ्रमणी त्यानि नादवावे
चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे
 
आणि दिव्य किरण तुझे २ अंतरी शिरावे
चपल तुझे चरण जरा या घरी स्थिरावे
 
रचना: बा. भ. बोरकर
गायन : पु ल देशपांडे