बुधवार, 4 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : बुधवार, 17 मे 2023 (09:52 IST)

Masik Shivratri 2023 वैवाहिक जीवनात काही अडथळे येत असतील तर करा मासिक शिवरात्री व्रत

महाशिवरात्री बद्दल सर्वांना माहिती आहे पण तुम्हाला मासिक शिवरात्रीबद्दल माहिती आहे का? जर नसेल तर आज आम्ही तुम्हाला त्याच गोष्टीबद्दल सांगणार आहोत जेणे करून तुम्ही देखील या दिवशी भगवान शंकराची पूजा करून पुण्य प्राप्त करू शकता. तुमच्या वैवाहिक जीवनात काही अडथळे येत असतील तर तुम्ही या दिवशी भोलेनाथाची पूजा करून अडथळे कमी करू शकता. चला तर मग आम्ही तुम्हाला सांगतो या महिन्यात शिवरात्री कधी येते.
 
मासिक शिवरात्री कधी असते
हिंदू कॅलेंडरनुसार, मासिक शिवरात्री उत्सव प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला साजरा केला जातो. या दिवशी उपवास केला जातो आणि भगवान शिवाची पूजा केली जाते. भगवान भोलेनाथांना समर्पित या तिथीचे शिवभक्तांसाठी विशेष महत्त्व आहे. प्रत्येक महिन्यात येणारी ही तिथी भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित आहे. म्हणूनच या दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीची पूजा विधीपूर्वक केली जाते. मासिक शिवरात्रीचे व्रत करणार्‍या व्यक्तीला भगवान शंकरासोबत माता पार्वतीचा आशीर्वाद प्राप्त होतो. यासोबतच त्याच्या जीवनात सुख-शांती कायम राहते.
 
या व्रतामध्ये रात्री भोलेनाथाची पूजा केली जाते. या दिवशी महादेवाचे व्रत करणाऱ्या मुलींना जे हवे ते मिळते. या मध्यरात्री भगवान शिव शिवलिंगाच्या रूपात प्रकट झाले. भगवान ब्रह्मा आणि भगवान विष्णू यांनीही या दिवशी भोलेशंकरची पूजा केली.
 
असे मानले जाते की या दिवशी लक्ष्मी, सरस्वती, सीता, पार्वती, रती या इतर देवींनी मोक्षासाठी उपवास आणि पूजा केली. जे लोक या दिवशी शंकराची पूजा करतात, त्यांच्यावर महादेवाची कृपा सदैव राहते.