शुक्रवार, 29 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Updated : शनिवार, 18 जानेवारी 2020 (13:59 IST)

Mauni Amavasya 2020: मौनी अमावास्येला हे दान करणे ठरेल शुभ

पौष महिन्यातील अमावस्याच आपलं महत्त्व आहे. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने विशेष पुण्य लाभ प्राप्त होतं. या दिवशी गंगा जल अमृत होतं असे मानले गेले आहे. म्हणून मौनी अमावस्या विशेष महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले गेले आहे. मौनी अमावास्येचा दिवशी व्रत करणार्‍यांनी दिवसभर मौन धारण करावं आणि दिवसभर मुनींसारखा व्यवहार केला पाहिजे. तसेच शास्त्रांप्रमाणे या दिवशी दान-पुण्य करण्याचे देखील महत्त्व आहे.
 
मौनी अमावस्या का शुभ मुहूर्त 
अमावस्या तिथी प्रारंभ- सकाळी 2 वाजून 17 मिनिटापासून (24 जानेवारी 2020)
 
अमावस्या तिथी समाप्त- दुसर्‍या दिवशी सकाळी 3 वाजून 11 मिनिटापर्यंत (25 जानेवारी 2020)
 
मौनी अमावास्येचं महत्त्व
शास्त्रात या दिवशी दान-पुण्य करण्याचं अत्यंत महत्त्व सांगण्यात आले आहे. एक मान्यतेनुसार या दिवशी मनु ऋषींचा जन्म झाल्याचं देखील मानलं जातं ज्यामुळे हा दिवस मौनी अमावस्या या रूपात साजरा केला जातो. शास्त्रांमध्ये वर्णित आहे की या महिन्यात पूजन-अर्चना व नदी स्नान केल्याने प्रभू नारायणाची प्राप्ती होते आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याने स्वर्ग प्राप्तीचा रस्ता देखील मोकला होतो. 
 
घरी स्नान करून अनुष्ठान करू इच्छित असणार्‍यांनी अंघोळीच्या पाण्यात गंगा जल मिसळून तीर्थांचे आव्हान करत स्नान करावे. या दिवशी सूर्यनारायणाला अर्घ्य दिल्याने गरिबी आणि दारिद्र्य दूर होतं.
 
मौनी अमावास्येला काय करावे?
या दिवशी नर्मदा, गंगा, सिंधू, कावेरी सह इतर पवित्र नद्यांमध्ये स्नान, दान, जप, अनुष्ठान केल्याने अनेक दोष दूर होतात. या दिवशी ब्रम्हदेव आणि गायत्री पूजन देखील विशेष फलदायी असतं. अमावास्येला 108 वेळा तुळशीला प्रदक्षिणा घालावी. चंद्र कमजोर असणार्‍यांनी गायीला दही आणि भात खाऊ घालावा याने मानसिक शांती लाभते. या व्यतिरिक्त मंत्र जप, सिद्धी साधना आणि दान करत मौन व्रत धारण केल्याने पुण्य प्राप्ती आणि देवाचा आशीर्वाद प्राप्त होतो. या दिवशी मौन व्रत धारण केल्याने विशेष लाभ प्राप्ती होते.
 
मौनी अमावास्येला काय दान करावे?
मौनी अमावास्येला तेल, तीळ, वाळलेलं लाकूड, ब्लँकेट, ऊनी वस्त्र, काळे कपडे, जोडे दान करावे. याचं विशेष महत्त्व आहे. तसेच ज्या जातकांच्या कुंडलीत चंद्र नीच असेल त्यांनी दूध, तांदूळ, खीर, खडीसाखर, बत्ताशे दान करावे. याने विशेष फल प्राप्ती होते.