सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By वेबदुनिया|

ओंकारातील उदात्त मात्रा म्हणजे गायत्री

विज्ञान आणि अध्यात्म यांचा संगम म्हणजे दुधात साखर पडल्यासारखे होय. संध्या करणे हे आता इतिहासजमा झाल्यासारखेच आहे. गायत्री मंत्राचा जप फारच थोडे लोक करतात. मुंजीत बटूला गायत्रीमंत्र शिकविण्यात येतो. हा जप केल्याने भूतबाधा होत नाही. तसेच सदाचरण, सत्कर्म करण्यासाठी मनुष्य नि:शंक आणि निर्भय होतो. गायत्री हे देवीचे नाव आहे. ते ऋग्वेदातील एका छंदाचेही नाव आहे. सूर्य-गायत्री विशेष प्रसिद्ध आहे. राम अगस्त्य मुनींच्या आश्रमात जातो. त्याला अठरा देवतांची देवळे दिसतात. त्यापैकी एक देऊळ गायत्रीचे होते. ब्रह्मदेवाच्या दुसर्‍या बायकोचे नाव गायत्री आहे.

एकदा ब्रह्मदेव यज्ञ करीत असताना यजमानपत्नी सरस्वतीला यज्ञमंडपात जायला उशीर झाला. यज्ञाची वेळ टळत होती. इंद्रदेव घाईघाईने आले. ब्रह्मदेवाची दुसरी पत्नी शोधताना त्यांना एक सुंदर गवळण दिसली. ती लोण्याचा हंडा डोक्यावरून नेत होती. त्यांना वाटलं, हीच ब्रह्मदेवाची पत्नी! तिला यज्ञाला बसविण्यात आले. यज्ञ सुरू झाला सरस्वती आल्यावर तिला खरा प्रकार कळला. ती संतापली. आणि तिने शाप दिला.हे ब्रह्मदेवा, यापुढे देवळात तुझी पूजा केली जाणार नाही. याला एकच दिवसाचा अपवाद असेल.

PR

गायत्री सरस्वतीच्या पाया पडली आणि भांडण मिटलं.’गायत्रीच्या जपानेच विश्वामित्र राजर्षीचा ब्रह्मर्षी झाला. ती पूर्व दिशेची अधिष्ठात्री आहे. ओंकारातील उदात्त मात्रा म्हणजे गायत्री. ती हंसवाहिनी आहे. गायत्री देवी कुमारी असून लाल वस्त्र नेसते. लाल दागशशदागिने घालते. अंगाला लाल उटणे लावतात. उपनिषदामध्ये गायत्री मंत्राच्या प्रत्येक अक्षराचे सविस्तर विवेचन केले आहे.