शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: गुरूवार, 14 मे 2020 (22:29 IST)

श्रीकृष्ण - रुक्मिणी संवाद : कर्णाचे काय चुकले ?

श्रीकृष्ण महाभारतच्या युद्धानंतर द्वारिकेत परत आल्यावर रुक्मिणी खूप संतापली होती, आणि रागाच्या भरातच तिने श्रीकृष्णाला विचारले, बाकी सर्व काही ठीक आहे, पण  द्रोणाचार्य आणि भीष्म पितामह सारख्या धार्मिक असणाऱ्यांचे हत्येचे समर्थन आपण कसे काय केले ?
 
श्रीकृष्ण उत्तरले 'हे खरे आहे की या दोघांनी आयुष्यभर धर्म पाळले, परंतु त्यांनी केलेल्या एका पापामुळे त्यांनी आपले सर्व पुण्य गमावले. 'ती पापे कोणती?' 
 
श्रीकृष्ण म्हणाले 'ज्यावेळेस द्रौपदीचे वस्त्रहरण होत होते त्यावेळी हे दोघे त्या राजसभेत उपस्थित होते आणि मोठे होण्याच्या नात्याने ते दुःशासनाला आज्ञा देऊ शकले असते, पण ह्यांनी असे नाही केले. या पापामुळे त्याचे धर्म लहान झाले.
 
रुक्मिणीने विचारले, आणि 'कर्ण' तो तर आपल्या दानशूरपणासाठी प्रख्यात होता, आणि कोणी ही त्याच्या दारातून रिकाम्या हाती परतला नाही. मग त्याचा काय दोष होता?
 
श्रीकृष्ण म्हणाले की खरं तर तो आपल्या दानशूरपणासाठी प्रख्यात होता. त्यांनी कधीच कोणाला नाही म्हटले नाही, पण जेव्हा सर्व योद्धांशी लढून अभिमन्यू घायाळ होऊन रणांगणात पडलेला असताना त्याने जवळ उभ्या असलेल्या कर्णाकडून पाणी मागितले. कर्ण जिथे उभा होता तिथे जवळच पाण्याचा खड्डा असूनही त्याने मरत असलेल्या अभिमन्यूला पाणी पाजले नाही. म्हणूनच त्याचे सर्व केलेले पुण्य नष्ट झाले. आणि नंतर त्याच खड्ड्यामध्ये त्याच्या रथाचे चाक अडकून त्याचे प्राण गेले.
 
अनेकदा असे घडते की आपल्या ओवतीभोवती काहीतर चूक घडतं असल्याची जाणीव असनू देखील आपण काहीही करु शकत नाही. आपण या विचारात असतो की या घडत असलेल्या चुकीसाठी आपण जबाबदार नाही किंवा या पापात आपण भागीदार नाही पण आम्ही मदत करण्याच्या स्थितीत असून सुद्धा काहीही मदत करत नाही. असे केल्याने आपण सुद्धा त्या पापाचे समान भागीदार होतो.

कुठल्याही जीवाने केलेले कर्म ते चांगले असो किंवा वाईट असो, शतकांपर्यंत आपला पाठलाग सोडत नसतात. त्याचा त्रास आपल्याला सहन करावाच लागतो. कोणते ही विचार कर्म करण्याचा आधी येतात. विचार आपल्या हट्टी मनावर नियंत्रण करण्यासाठी मनाची अत्यंत सूक्ष्म क्रिया असते.