शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By

शुभ पुष्य नक्षत्रावर काय करणे योग्य ठरेल, नक्की जाणून घ्या

ऋग्वेदात पुष्य नक्षत्राला मंगलकर्ता देखील म्हटले गेले आहे. पुष्य नक्षत्रात खरेदी करण्यासाठी विशेष मुहूर्त मानाला गेला आहे. या मुहूर्तात खरेदी केलेली वस्तू अधिक काळापर्यंत उपयोगी, शुभ फल देणारी आणि अक्षय असते. कोणत्याही महिन्यात येणार्‍या पुष्य नक्षत्रात शुभ कार्य करता येऊ शकतात. जाणून घ्या कोणते खास कार्य या दरम्यान केले जाते-
 
1. पुष्य नक्षत्राचा स्वामी शनी आहे म्हणून या दिवशी शनी व्रत आणि पूजन केलं जातं.
 
2. पिंपळाच्या झाडाला पुष्य नक्षत्राचं प्रतीक मानले गेले आहे. म्हणून पिंपळाच्या झाडाची पूजा करणे शुभ मानले गेले आहे.
 
3. पुष्य नक्षत्रात स्वर्ण खरेदी करण्याची परंपरा आहे म्हणून याला शुद्ध, पवित्र आणि अक्षय धातूच्या रूपात मानले जाते आणि पुष्य नक्षत्रात खरेदी अधिकच शुभ होऊन जाते. 
 
4. या नक्षत्रात भवन आणि भूमी खरेदी करणे शुभ मानले गेले आहे. या दिवशी मंदिर निर्माण, घर निर्माण इतर काम प्रारंभ करणे शुभ मानले गेले आहे. 
 
5. या दिवशी पूजा किंवा उपास करण्याने जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश प्राप्ती होते. 
 
6. सर्वप्रथम आपल्या घरामध्ये सूर्योदय आणि सूर्यास्तावेळी देवी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावावा. एखाद्या नव्या मंत्राने जपाची सुरुवात करा.
 
7. या दिवशी डाळ, खिचडी, तांदूळ, बेसन, कढी, बुंदीचे लाडू सेवन करावे आणि यथाशक्ती दान करावं.
 
8. या नक्षत्रात शिल्प, चित्रकला आणि पुस्तक, बहीखाते खरेदी करणे उत्तम मानले गेले आहे. 
 
9. या दिवशी नवीन कार्याची सुरुवात करा, जसे ज्ञान किंवा विद्या आरंभ करणे किंवा काही नवीन शिकणे, दुकान उघडणे, नवीन लिखाण करणे इतर...
 
10. या व्यतिरिक्त पुष्य नक्षत्रात दिव्य औषधं आणून त्यांची सिद्धी केली जाते. या दिवशी कुंडलीत विद्यमान दूषित सूर्याचं दुष्प्रभाव कमी केलं जाऊ शकतं.
 
पुष्य नक्षत्र सोमवार असल्यास त्याला सोम पुष्य, मंगळवारी आल्यास भौम पुष्य, बुधवारी आल्यास बुध पुष्य, गुरुवारी आल्यास गुरु पुष्य, शुक्रवारी आल्यास शुक्र पुष्य, शनिवारी आल्यास शनी पुष्य आणि रविवारी आल्यास रवी पुष्य नक्षत्र म्हणतात. यापैकी गुरु पुष्य, शनी पुष्य आणि रवी पुष्य नक्षत्र सर्वात उत्तम मानले गेले आहे.