गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: डालियान , सोमवार, 25 जानेवारी 2021 (14:07 IST)

चीन: गॅस पाईपलाईनमध्ये गळतीमुळे भीषण स्फोट, दोन जण ठार, 8 जखमी

चीनच्या लेओनिंग प्रांतात गॅस पाईपलाईनमध्ये गळतीमुळे स्फोट झाला. ही घटना सोमवारी पहाटेची आहे. ग्लोबल टाईम्सच्या वृत्तानुसार, या स्फोटात दोन लोकांचा मृत्यू झाला आणि सुमारे 8 जण जखमी झाले. तर गॅस कंपनीचे तीन लोक बेपत्ता आहेत. अग्निशमन दलाची 10 वाहने घटनास्थळी दाखल झाली असून आग विझविण्याचे काम सुरू आहे. सध्या घटनास्थळावर पोलिसही या घटनेचा तपास करत आहेत.