बुधवार, 27 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बीजिंग , बुधवार, 28 ऑक्टोबर 2020 (13:20 IST)

चीनमध्ये पुन्हा पसरतो कोरोना

चीनमधील एका मोठ्या शहरामध्ये 50 लाख नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात येणार आहेत. या संपूर्ण भागामध्ये पुन्हा लॉकडाउन लागू करण्याची  तयारी सुरु करण्यात आली आहे.
 
चीनच्या पश्चिमेकडील शिनजियांगजवळील काशगरमध्ये या चाचण्या करण्यात येणार आहे. या भागामध्ये लक्षणे न दाखवणारे अनेक रुग्ण आढळून येत असल्याने एवढ्या मोठ्याप्रमाणात चाचण्या करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.  
 
चाचण्यांना सुरुवात करण्यात आल्यापासून 137 कोरोनाबाधित आढळून आले आहेत. झिंजियांगमधील आरोग्य अधिकार्‍यांनी चाचण्यांची संख्या वाढवण्यात आल्याचं सांगितलं आहे. एका कापड कारखान्यातील 17 वर्षीय तरुणी कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर तिच्या संपर्कात आलेल्या अनेकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झालं आहे. मात्र या मुलीला कोरोनाचा संसर्ग कसा झाला यासंदर्भातील तपास आरोग्य अधिकारी करत असल्याचे रॉयटर्सने दिलेल्या वृत्तात म्हटलं आहे. रविवारी दुपारपर्यंत चीनमधील या भागातील 28 लाखांहून अधिक नागरिकांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. मंगळवारपर्यंत या भागातील 47 लाख नागरिकांच्या चाचण्या पूर्ण करण्यात येतील अशी अपेक्षा सरकारी अधिकार्‍यांना आहे.