शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 28 एप्रिल 2023 (16:47 IST)

दिल्लीत बेडवर आढळला महिलेचा मृतदेह, मृत नायजेरियाची आहे

दिल्लीत एका महिलेचा मृतदेह बेडवर आढळून आला आहे. महिलेची हत्या केल्यानंतर मृतदेह बेडमध्ये गुंडाळून लपवून ठेवला होता.
 
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना मैदनगढी भागातील असून, फ्लॅटमधील बेडच्या आत एका बॉक्समध्ये महिलेचा मृतदेह आढळून आला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही महिला मूळची नायजेरियन होती. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा मृतदेह तीन ते चार दिवसांचा आहे. शेजारी राहणाऱ्या लोकांनी पोलिसांना फोन करून सांगितले की फ्लॅट 3 दिवसांपासून बंद आहे आणि आतून दुर्गंधी येत आहे. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून तपास केला असता महिलेचा मृतदेह आढळून आला.