रविवार, 26 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 8 जुलै 2022 (14:26 IST)

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन, भाषण करताना गोळी लागली

जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांचे निधन झाले. नारा शहरात भाषण सुरू असताना हल्लेखोराने त्यांच्यावर दोन गोळ्या झाडल्या. त्याच्या मानेवर आणि छातीवर गोळ्या लागल्याचे वृत्त आहे. तसेच, रुग्णालयात नेत असताना त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता.
 
 जपानचे माजी पंतप्रधान शिंजो आबे यांच्यावर शुक्रवारी हल्ला झाला असून त्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. जपानच्या सार्वजनिक प्रसारक NHK ने दिलेल्या वृत्तानुसार, ही घटना स्थानिक वेळेनुसार सकाळी 11.30 च्या सुमारास घडली. आबे नारा शहरात एका कार्यक्रमाला संबोधित करत असताना त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. गोळ्यांचा आवाज ऐकल्यानंतर आबे रक्तबंबाळ अवस्थेत असल्याचे अहवालात म्हटले आहे.