शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By

शिव्या इंडियाला घालायच्या म्हणून हिंदूंवर करतात थट्टा

मागील काही दिवसांपूर्वी पाकिस्तानच्या नॅशनल असेंब्लीत हिंदू सदस्य लालचंद माल्हीचे भाषण व्हायरल झाले ज्यात त्यांना गायीचे पुजारी म्हणून त्यांचा मजाक उडवण्यात येतो असे म्हटले. माल्ही यावर खूप नाराज होते की पाकिस्तानी खासदार त्यांना गायीचे पुजारी आणि हिंदू हिंदू असे चिडवतात. माल्हीने बजेट सत्रादरम्यान विरोध दर्शवले आणि स्पीकरला तक्रारदेखील नोंदवली.
 
उल्लेखनीय आहे की हा व्हिडिओ मागील जून महिन्याचा आहे. माल्हीने स्पीकरला सांगितले की मी हे ऐकून हैराण झालो की खासदार जमशेद जस्ती आणि माजी पीएम मीर जफरूल्ला खान जमाली म्हणत होते की हिंदू तर गायीची पूजा करतात. जेव्हा स्पीकरने त्यांना बसण्याचा आग्रह केला तर ते म्हणाले मिस्टर स्पीकर मी हाउसचे नियम वाचले आहे आणि त्याचा सन्मान करतो.
 
आम्ही तर पाकिस्तानी आहोत
माल्ही यांनी बजेट सत्र दरम्यान म्हटले की मी मागील काही दिवसांपासून बघत आहे. येथे म्हणतात की हिंदू गायीची पूजा करतात. त्यांनी म्हटले की गायीची पूजा करणे आमचे हक्क असून आम्ही असे करू. हिंदू हिंदू म्हणून आमच्यावर जोक केले जातात. आम्ही तर पाकिस्तानी आहोत मग हे असे का नाही म्हणत की आम्ही यांचे पाकिस्तानी आहोत.
 
हिंदूला शिव्या घालतात खासदार
त्यांनी म्हटले की संसदेत आवश्यक चर्चा होत नसून हिंदूंना चिडवण्याचे काम होतं. खासदारांना फटकारत माल्ही यांनी म्हटले की यांना शिव्या घालायचा असतात भारताला पण ते हिंदूंना शिव्या घालतात. त्यांनी विचारले यात माझा गुन्हा तरी काय?
 
त्यांनी जबरदस्तीने धर्मांतरण प्रकरणावर म्हटले की काही दिवसापूर्वी एका हिंदू मुलाचे अपहरण करून त्याला मुसलमान बनवले, यावर सर्व खासदार गप्प आहे. येथे केवळ थट्टा केली जाईल. हिंदूविषयी बोलायचे आहे तर त्या 14 वर्षाच्या मुलांबद्दल बोलावे ज्याला मुसलमान बनवण्यात आले. सोशल मीडियावर हा व्हिडिओ खूप शेअर केला जात आहे.