सोमवार, 2 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: शनिवार, 27 ऑक्टोबर 2018 (10:12 IST)

मेगन मर्केल पुन्हा एकदा ड्रेसवरचा प्राईस टॅगवरून ट्रोल

ब्रिटीश राजघराण्याची धाकटी सून डचेस ऑफ ससेक्स मेगन मर्केल पुन्हा एकदा ट्रोल झाली आहे. प्रिन्स हॅरी आणि मेगन सध्या तीन देशांच्या दौऱ्यावर आहेत. लग्न झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच मोठा दौरा होता. ऑस्ट्रेलियाचा दौरा आटोपून प्रिन्स हॅरी व मेगन गुरुवारी फिजीच्या टोंगा शहरात पोहचले. त्यावेळी स्टिलेटो हिल्स, काळ्या रंगाच्या क्लचसह डार्क लाल रंगाचा सुंदर ड्रेस परिधान करुन मेगन चार्टर्ड प्लेनमधून खाली उतरली. सर्वांच्या नजरेस पडला तो ड्रेसवरचा प्राईस टॅगवर. मेगनच्या पायाजवळ असलेला हा टॅग स्पष्टपणे दिसत होता. मेगनला ड्रेस परत करायचा असेल बहुतेक, असं म्हणून काहींनी ट्रोल केलं तर तिच्या सौंदर्याचं कौतुक करत काहींनी त्याकडे दुर्लक्ष केलं. 
 
लग्न झाल्यापासून मेगन अनेकदा ट्रोल झालीय. दिवंगत प्रिन्सेस डायनाच्या भाचीच्या लग्नात घातलेल्या ऩिळ्या पांढऱ्या रंगाच्या ढगळ मॅक्सी ड्रेसमुळे मेगन ट्रोल झाली. त्यानंतर रॉयल एअर फोर्सच्या १०० व्या वर्धापन दिन कार्यक्रमात मेगनने घातलेल्या काळ्या रंगाच्या ड्रेसवर जोरदार टीका झाली.