बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Updated : सोमवार, 25 ऑक्टोबर 2021 (18:43 IST)

बघा सरळ भिंतीवर चालणाऱ्या शेळ्या

प्राण्यांशी संबंधित अनेक सध्या इंटरनेटवर व्हायरल होत असतात. यातील काही खूप मजेदार असतात, तर काही पाहून आश्चर्यही वाटते. एक व्हिडिओ सध्या, शेळ्यांशी संबंधित सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, जो पाहिल्यानंतर तुम्हाला तुमच्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. व्हिडिओमध्ये काही शेळ्या केवळ धरणाच्या सरळ भिंतीवर चढताना दिसत नाहीत, तर तुम्ही धावतानाही दिसतील. हे दृश्य खूपच थक्क करणारे आहे.   

या माउंटन गोट्स आहेत, ज्या धरणाच्या शेकडो फूट उंच भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत आहेत. व्हायरल व्हिडीओची सुरुवात पाहून तुम्हाला बकऱ्यांचे हे काम सोपं वाटेल. पण जेव्हा व्हिडीओमध्ये धरणाचे एरियल व्ह्यू दाखवले जातात, तेव्हा ते किती अवघड आणि धोक्याचे आहे याची कल्पना येईल.
IFS सुशांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवर हा व्हिडिओ शेअर केला आहे. त्याने कॅप्शनमध्ये लिहिले की, हे माउंटन गोट्स आहेत, ज्या इटलीतील धरणाच्या सरळ भिंतीवर चढण्याचा प्रयत्न करत आहेत. हा व्हिडिओ ट्विटरवर शेअर होताच व्हायरल झाला आहे. आतापर्यंत 8 हजार पेक्षा जास्त वेळा पाहिले गेला आहे. तर शेकडो लोकांनी लाइक केला आहे.