बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: रविवार, 6 ऑगस्ट 2023 (16:29 IST)

Pakistan: पाकिस्तानमध्ये मोठा रेल्वे अपघात, रुळावरून घसरली ट्रेन, 15 जणांचा मृत्यू

Pakistan Train Accident  :पाकिस्तानमध्ये मोठा रेल्वे अपघात झाल्याचे वृत्त आहे. पाकिस्तानी मीडियानुसार, रावळपिंडीहून धावणाऱ्या हजारा एक्स्प्रेसचे आठ डबे रुळावरून घसरले आहेत. या अपघातात आतापर्यंत 15 जणांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास 50 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे. सहारा रेल्वे स्थानकाजवळ हा अपघात झाला. हे स्टेशन शहजादपूर आणि नवाबशहा दरम्यान आहे. रावळपिंडीहून जाणाऱ्या हजारा एक्स्प्रेसचे दहा डबे रुळावरून घसरले , त्यात किमान15 जण ठार आणि 50 जण जखमी झाले.
 
जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रेन रुळावरून घसरण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. अधिकारी तपास करत आहेत. पाकिस्तानी माध्यमांनी पाकिस्तान रेल्वेचे विभागीय अधीक्षक सुक्कूर मोहम्मदुर रहमान यांच्या हवाल्याने सांगितले आहे की 10 बोगी रुळावरून घसरल्या आहेत. पोलिसांनी सांगितले की, बाधित बोगीतून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. नजीकच्या रुग्णालयांमध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली आहे. 

या रेल्वे अपघातानंतर, सिंधच्या अंतर्गत जिल्ह्यांकडे जाणारी आणि जाणाऱ्या गाड्यांचे संचालन थांबवण्यात आले आहे. यासोबतच बचाव पथक घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना नवाबशहाच्या पीपल्स मेडिकल हॉस्पिटलमध्ये दाखल केले. रेल्वे रुळावरून घसरण्याचे कारण अद्याप समजू शकले नसल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
बाधित बोगीतून प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी पथके घटनास्थळी उपस्थित आहेत.
 



Edited by - Priya Dixit