गुरूवार, 19 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. आंतरराष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 15 मे 2024 (12:36 IST)

पाकिस्तानी उद्योगपती अमेरिकेमध्ये म्हणाले, तिसऱ्यांदा नक्की पीएम बनतील नरेंद्र मोदी

मूळ पाकिस्तानचे असलेले एक प्रसिद्ध अमेरिका उद्योगपती वॊशिंग्टनमध्ये म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे एक मजबूत नेता आहेत. ज्यांनी भारताला एका नव्या उंच शिखरावर पोहचवले आहे. ते परत आता तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान बनतील. 
 
बाल्टिमोर निवासी मूळ पाकिस्तानचे असलेले अमेरिका प्रसिद्ध उद्योगपती साजिद तरार म्हणाले की, मोदी फक्त भारता करिताच चांगले नाही तर पूर्ण जगासाठी चांगले आहेत. आम्हाला देखील त्यांचा सारखा नेता हवा. अशी अशा त्यांनी व्यक्त केली. 
 
तसेच ते म्हणाले की मोदी एक चांगले नेता आहे. ते असे एक पंतप्रधान आहेत ज्यांनी कठीण परिस्थितीमध्ये पाकिस्तान दौरा केला. मी आशा व्यक्त करतो की, मोदीजी पाकिस्तान सोबत संवाद आणि व्यापार सुरु करतील. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, भारतासाठी शांतीपूर्ण पाकिस्तान चांगला राहील. तसेच ते म्हणालें की, सर्व ठिकाणी हीच चर्चा होत आहे की, मोदीजी भारताचे पंतप्रधान बनतील. 
 
तरार हे 1990 मध्ये अमेरिकेला आले होते. तसेच पाकिस्तानमधील सत्तेत असणाऱ्या लोकांशी त्यांचे चांगले संबंध आहे. ते म्हणाले की, हे चमत्कारापेक्षा कमी नाही की भारत 97 कोटी लोक आपल्या मतदान अधिकाराचा उपयोग करीत आहे. भारत सर्वात मोठे लोकतंत्र आहे. मी मोदीजींची लोकप्रियता पाहत आहे.